Ferfar #3106 · भोपर
कल्याण, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 249/19
- Talathi
- हनुमंत गजेंद्र जाधव
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
सक्षम अधिकारी उपविभागीय अधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक 77 दिनांक 23/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
स.नं. / गट नं. =249/19
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
मा. उपविभागीय अधिकारी कल्याण उपविभाग कल्याण यांचेकडील आदेश क्र./टे-८-कल्याण/ शर्तशिथील/कल्याण/एसआर क्रं.-७७/२०२६ दि.२३/१०/२०२६ प्रमाणे खातेदार श्री.महेश दिनकर पाटील व इतर यांचे नांवे असलेलीमौजे भोपर येथील स.नं.२४९/१९ क्षेत्र ०-२३-०० हे आर चौ.मी. पो.ख. ०-१२-३० आकार ०-२७ रु.पै, ची जमिन कु.का.क ४३ ला पात्र नुसार नावे दाखल आहे. सदरच्या जमिनी वर्ग -१ करणेकामी आकाराचे ४० पट नजराणा रक्कम रुपये ३२०/- वसुल करुन चलन क्र. ३४/२०२६ दि.२३/१०/२०२६ ¬रोजी शासन जमा केली आहे. त्यानुसार मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३(१) व तदअनुषंगीक मुंबई कुळवहिवाट अधिनियम, १९५६ च्या नियम २५अ(१) (फ) मधील अटी व शर्तीस अधीन ठेवुन व महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.टि.एन.सी ४/१३ प्र.क्र. १९६/ज-१/दि. ११/०२/२०१४ अन्वये आदेशातील अटी व शर्ती १ते ६ ला अधीन राहून कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचेकडील मंजूर आराखाड्यानुसार जमीन मिळकत हस्तांतरण करणेकामी जमीनीची भुधारणा पध्दती वर्ग -२ ऐवजी वर्ग -१ करणेकामी ७/१२ सदरी असलेली कु.का.क ४३ ची शर्तशिथील करण्यात आली असे.