Ferfar #8122 · बदलापूर
अबंरनाथ, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.उपविअ/भूसं./व.मुं.रा.म./कावि-385/2022
आदेश दिनांक : 22/06/2023
आदेशाने बाजूस दाखल केलेल्या स.नं. च्या जमिनी बाबत मा. उपविभागीय अधिकारी उल्हासनगर, उपविभाग उल्हासनगर यांचे कडील आदेश क्र. उपविअ/भूसं./व.मुं.रा.म./कावि-385/2022, दिनांक 22/06/2023 अन्वये मौजे-बदलापूर, ता.अंबरनाथ, जि.ठाणे येथील स.नं. 246/1/अ जमिन मिळकतीचे 7/12 उताऱ्याचे इतर हक्कात फेरफार क्र. 6357 अन्वये भुसंपादनात समाविष्ट अशी नोंद ठेवण्यात आलेली आहे. मात्र उपअधिक्षक भूमी अभिलेख अंबरनाथ यांचेकडील मौजे बदलापूर येथील संयुक्त मोजणी अहवालानुसार अर्जदार यांचे मौजे-बदलापूर येथील स.नं. 246/1/अ जमिन मिळकत वडोदरा मुंबई द्रुतगती राष्ट्रीय राजमार्ग भूसंपादनात बाधित होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे मौजे बदलापूर, स.नं. 246/1/अ या 7/12 ला कब्जेदार सदरी दाखल असलेले प्रेसिडेंट ऑफ इंडिया थ्रू द मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्ट अँड हायवेज क्षेत्र 0.0335 हि नोंद कमी करून मौजे-बदलापूर येथील स.नं. 246/1/क जमीन मालक जनार्दन वामन तरे व इतर यांच्या 7/12 ला कब्जेदार सादरी भुसंपादन संस्थेच्या नावाची नोंद घेतले असे.
नोंद - मा. उपविभागीय अधिकारी उल्हासनगर, उपविभाग उल्हासनगर यांचे कडील आदेश क्र. उपविअ/भूसं./व.मुं.रा.म./कावि-385/2022, दिनांक 22/06/2023 व लगत सुधर्म सुरेश ओक यांना मा. उपविभागीय अधिकारी उल्हासनगर, उपविभाग उल्हासनगर यांचे कडील आदेश क्र. उपविअ/भूसं./व.मुं.रा.म./कावि-27/2026, दिनांक 10/04/2026 व लगत मा. तहसीलदार अंबरनाथ यांचे कडील पत्र क्र. महसूल/हक्कनोंद/टे-4/कावि-794/2026 दिनांक 27/07/2026 अन्वये नोंद.