Ferfar #1524 · चरगाव
अबंरनाथ, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 614
- Talathi
- निलम अनिल सावंत
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र.मशा /कार्या-4/टे- 1/टेनन्सी /न.शर्थ- सिलींग/एस आर -01/2026 दिनांक 08/10/2026 अन्वये उत्तम पांडुरंग शेळके व इतर यांचे कु.मु म्हणून वसंत एकनाथ पाटील यांनी मौजे -चरगांव येथील गट नं 614 क्षेत्र 1-95-00 हे.आर पो.ख 0-10-00 हे.आर एकूण क्षेत्र 2-05-00 हे.आर आकार 3.00 यात नमूद केलेले असलेले आदेशातील अटी व शर्ती खालील प्रमाणे.
1). सदर जमिनीचे रुपांतरण अधिमूल्य रक्कम रु.५,१६,९०८/- (अक्षरी पाच लाख सोळा हजार नऊशे आठ
मात्र) इतकी रक्कम अर्जदार यांनी तीन महिन्याच्या आत शासन जमा करणेबाबत करावयाची आहे.
तहसीलदार अंबरनाथ यांनी अर्जदार यांचेकडून सदर जमिनीचे रुपांतरण अधिमूल्य शासनजमा
केल्यानंतरच या आदेशाची अंमलबजावणी करावी. अर्जदार यांनी नमूद रुपांतरण अधिमूल्य विहीत
मुदतीत शासन जमा केले नाही, तर सदर आदेश रद्द समजण्यात येईल.
२. सदर जमिनीचें भोगवटादार वर्ग-२ धारणाधिकारावरुन भोगवटादार वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करण्यात येत
•असले तरी वेळोवेळी पारीत होणारे शासन निर्णय संबंधितावर बंधनकारक राहतील.
३. भविष्यात लेखापरिक्षणामध्ये अनर्जित रकमेबाबत आक्षेप उपस्थित झाल्यास त्यानुसार होणारी फरकाची
रक्कम जमीन भोगवटदाराने शासन जमा करणे बंधनकारक राहील.
४. सदर जमिनीच्या मालकी हक्काबाबत वाद निर्माण झाल्यास त्याबाबतचे होणारे निर्णय संबंधितावर
बंधनकारक राहतील.
५. भविष्यात सदर जागेवर या आदेशापूर्वीच शर्तभंग केल्याचे अथवा बांधकाम केल्याचे निदर्शनास आल्यास
शासनाचे प्रचलित नियमानुसार शर्तभंगाबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल.
६. प्रस्तावित जागेवर बिनशेती प्रयोजनार्थ बांधकामास सुरुवात करणेपूर्वी नियोजन प्राधिकारी यांचेकडून
बांधकाम परवानगी घेणे अनुज्ञाग्राही यांचेवर बंधनकारक राहील.
७. सदर जमीन भूसंपादनात येत नसल्याबाबत तहसीलदार अंबरनाथ यांनी खात्री करावी,तदनंतरच अधिकार
अभिलेखात नोंद घेणेबाबत योग्य ती कार्यवाही करावी.
८. भविष्यात उक्त जमिनीचे क्षेत्रावर "वन" संज्ञे बाबतची नोंद आढल्यास ती संबंधितावर बंधनकारक
राहील.७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळवहीवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :कुळ कायदा कलम 43 च्या शर्तीस पात्र
बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.