सातबारा Watch

← बेंडशिळ

Ferfar #1170 · बेंडशिळ

अबंरनाथ, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
46/2/ब
Talathi
सुधाकर वेडू सोनवणे
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026लिहुन देणार : देऊ कमळु हंबीर रा. बेंडशिळ(खाता क्रमांक139) यांचे गट/सर्व्हे क्रमांक46/2/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 3.3700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : हेमलता अभिमन्यु भोये , (खाता क्रमांक :-556)गट/सर्व्हे क्रमांक 46/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक उल्हासनगर 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 437 दिनांक 09/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1181500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. खरेदीची रक्कम मिळाल्याबाबतचा तपशिल खालील प्रमाणे धनादेश क्रमांक दिनांक बॅकेचे नांव र.रुपये 240052 9/1/2026 एस बी आय 600000/- 240054 9/1/2026 एस बी आय 581500/- एकुण रक्कम 1181500/- घेऊन खरेदी दिली सबब खरेदी घेणा-याचे नांव गांव नमुना 7/12 वर दाखल केले मा.जिल्हाधिकारी ठाणे यांचे कडिल आदेश क्रमांक मशा/का-4/टे-1/टेनन्सी/एसआर -69/2020 दि.18/12/2025 व मुदतवाढ आदेश दिनांक 18/12/2025 नुसास विक्री पनवानगी दिली असुन त्यातील अटी व शर्ती खालील प्रमाणे अटी व शर्ती 1.जमिनीवरील महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 36 36 अ अन्वये हस्तांतरणास बंदी हा शेरा कायम ठेवण्यात यावा 2.सदर जमिनीची सन 2023-24 च्या बाजारमुल्यदर तक्यानुसार जमिनीची किंमत रक्कम रु.1181500/- (अक्षरी अकरा लाख एक्याऐंशी हजार पाचशे रुपये मात्र ) इतकी होत असुन जमीन खरेदीदार यांनी आदिवासी जमीन मालक यांना देणेंत यावी व त्याबाबत तहसिलदार यांनी खात्री करावी 3.आदिवासीचे नांवे तहसिलदार यांचेसमोर राष्ट्रीयकृत बॅकेत खाते उघडुन सदर रक्कम चेकव्दारे त्यांना अदा करणेत यावी. 4.जमिन विकत घेणार यांनी सदरच्या जमिनीचा वापर शेती प्रयोजनार्थ करावयाचा आहे अन्य प्रयोजनासाठी जमिनीचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास जमीन सरकार जमा करण्यात येईल 5.सदर जमिनीवर बोजा अगर सरकारी बाकी असल्यास खरेदीदार यांनी जमिन खरेदी करण्यापुर्वी त्याची पुर्तता करण्याची आहे 6.सदर जमिन खरेदी केल्यानंतर जमिन खरेदीदार यांचे कडिल एकुण धारण क्षेत्र शेतजमिन कमाल मर्यादेपेक्षा जास्त होणार नाही याची तहसिलदार यांनी स्वत खात्री करावी 7.प्रस्तुत जमिन विक्री व्यवहारास जमीन मालकाच्या वारसाची व हितसंबधितांची काहीएक तक्रार अगर हरकत राहणार नाही याची तहसिलदार यांनी खात्री करण्याची आहे 8.जमिन खरेदीदार यांना या कार्यालयाच्या पुर्व परवानगीशिवाय कोणासही जमिन हस्तांतरण करता येणार नाही. 9.जमिनीची ठरवुन दिलेली एकुण किंमत जमीन विकणा-या खातेदारास मिळाल्याशिवाय जमिनीचे खरेदीखत करता येणार नाही. 10.जमिन खरेदी करणार यांनी या आइेशाच्या तारखेपासुन 6 महिन्याचे आत खरेदीखत केले पाहिजे खरेदीखत झाल्यानंतर 15 दिवसांचे आत तसे या कार्यालयाकडे कळविले पाहिजे 11.जमिनीचा प्रत्याक्षात ताबा घेतल्यापासुन 6 महिन्याच्या आत शतीकरिता जमिनीचा वापर सुरु करणेचा आहे 12.सदरची विक्री परवानगी ही विक्री करणारे व खरेदी करणारे यांनी दिलेली कागदपत्रे व परिस्थिीती खरी समजुन तसेच उपविभागीय अधिकारी/ तहसिलदार यांनी शिफारस केल्यानुसार दिली असुन कोणत्याही कायदयाचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास जमीन विक्री करणारे व खरेदी करणारे हे सर्वस्वी जबाबदार राहतील 13.सदर जमिन भुसंपादनात येत नसल्याबाबत उपविभागीय अधिकारी उल्हासनगर उपविभाग उल्हासनगर कळविले आहे भविष्यात जमी भुसंपादनात मागणी झाल्यास ती विना तक्रार द्यावी लागेल 14.भविष्यात उक्त जमिनीचे क्षेत्रावर वन सज्ञे बाबतची नोंद आढल्यास ती सबंधितावर बंधनकारक राहील 15.सदर विक्रीमुळे अस्तित्वात असलेल्या कोणत्साही कायदयाचा महाराष्ट्र शेतजमिन (जमिन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961 मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम 1947 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 भारतीय वन अधिनियम 1927 वन (संरक्षण)अधिनियम 1980 व तदअनुशंगाने शासन पुरक धोरण तसेच शासनाचे प्रचलित धोरणांर्गत इ.शासन निर्णयाचा /शासन धोरणांचा भंग होणार नाही याबाबत तहसिलदार यांनी खातरजमा करावी याबाबत कोणताही भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार त्वरीत कार्यावाही करावी. 16.सदरच्या विक्रीमुळे आदिवासी जमिन मालक भुमिहीन होत नाही याची खातरजमा करुन त्यानंतर पुढील कार्यवाही करणेत यावी. 17.वरील शर्तीचा व अटीचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास अथवा अन्य र्गरव्यवहार झाल्याचे आढळल्यास सदरचा आदेश रदृ समजण्यात येईल व खरेदीदार/जमिन मालक यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल 18.सदर विक्री परवानगीबाबत फेरफार नोंदवितांना आदिवासी जमिन मालक यांस जमिनीची अंतीमत रक्कम मिळाल्याबाबत पुर्ण तपशिल बॅकांचे नांव पासबुक क्रमांक तारखासह फेरफारात नोंदविण्यात यावा आदिवासी विक्री परवानगीचा फेरफार मंडळ अधिकारी यांनी मंजुर करु नये संपुर्ण खात्री करुन तहसिलदार यांनी स्वत मंजुर करणेचाबाबत कार्यवाही करावी वर्दी अर्ज खरेदीखत , सुची क्र.2 मा.जिल्हाधिकारी ठाणे यांचे कडिल आदेश क्रमांक मशा/का-4/टे-1/टेनन्सी/एसआर -69/2020 दि.18/12/2025 व मुदतवाढ आदेश दिनांक 18/12/2025 व मा.तहसिलदार अंबरनाथ यांचे कडिल आदेश क्र.मशा/कार्या-1/टे-5/आदिवासी ते आदिवासी/कावि-10/2026 जा.क्र.2498 दि.26/10/2026 वरुन नोंद