Ferfar #993 · आंबेळे बु.
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 528
- Talathi
- रेश्मा बाळु देसले
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कल्याण उपविभाग कल्याण यांचेकडील आदेश-क्र./टे-8 श,शि./मुरबाड/एस.आर.क्र.50/26 दिनांक – 06/10/2026 उक्त आदेशाने मौजे-आंबेळे बु., ता. मुरबाड येथील खालील वर्णनाच्या मिळकतीच्या कब्जेदार सदरी श्री. तुळशीराम अनंता शिरोसे व इतर रा. आंबेळे बु., ता. मुरबाड, जि. ठाणे यांचे नाव आहे. त्यांनी सदर मिळकत मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 कलम 32 ग व 32 म प्रमाणे मालकाकडुन खरेदी केली आहे. सदर शासन निर्णय क्र.टिएनसी - 4/13/प्र.क्र.196/ज-1/, दिनांक 07/05/2014 रोजीच्या शासन निर्णयानुसार अर्जात नमुद केलेल्या खालील परिशिष्ट ‘अ’ मध्ये दर्शविलेल्या जमिनीचे क्षेत्राची मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1948 चे कलम 43 (1) व तदअनुषंगिक मुंबई कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1956 च्या नियम 25 अ (1) (फ) मधील अटी व शर्तीस अधिन व उपरोक्त आदेशातील वाचले मधील संदर्भीय परिपत्रक क्र.4 नुसार नमूद तरतुदीस अधिन राहुन शर्त शिथिल परवानगी देणेत येत आहे.
परिशिष्ट ‘अ’
मधील मौजे आंबेळे बु., ता. मुरबाड येथील 7/12 नुसार भोगवटादार श्री. तुळशीराम अनंता शिरोसे व इतर यांचे नावे दाखल गट नं. 528, जुना सर्वे नं./हि.नं. 57/6, क्षेत्र – 0.36.0 हे.आर.प्र., पो.ख.- 0.09.00 हे.आर.प्र., आकार – 0.33 रु.पै.
बाबत उक्त आदेशातील वाचले – 8. नुसार अर्जदार यांनी नजराणा म्हणून आकाराचे 40 पट रक्कम रु.320/-(अक्षरी रु. तीनशे वीस मात्र) चलन क्र.28/2026 दिनांक 06/10/2026 (ग्रास नं.- GRN MH011484980202627U) नुसार शासन जमा केलेने
अटी व शर्ती :- 1) सदरच्या आदेशान्वये परिशिष्ट - अ मधील जमिनीसंदर्भात महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची शर्त शिथील करणेत येत आहे.
2) सदरच्या आदेशान्वये परिशिष्ट - अ मधील जमिनी संदर्भात महाराष्ट्र कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची शर्त शिथील केल्यामुळे अथवा शर्त कमी केल्यामुळे जमिनीस भोगवटादार वर्ग 1 असा करणेत येत आहे व परिशिष्ट - अ मधील जमीन महाराष्ट्र कूळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे नियंत्रणापासून मुक्त होईल व राहील.
3) गांव नमुना 1(क) मधील नोंदवहीतून परिशिष्ट - अ मधील वगळणेत येत आहे.
4) तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण सो. मुरबाड यांचे कार्यालयाकडील आदेश क्रमांक क्र. टेनन्सी/एस.आर. 36/2026 दिनांक 10/07/2026 हुकुम नंबर 3220 दिनांक 05/10/1965 लेजर क्र. 03/194 आदेशाने तसेच दुय्यम निबंधक मुरबाड यांचेकडील सर्टिफिकेट ऑफ सेल दस्त क्रमांक 6455/2026 दिनांक 27/07/2026 खरेदी प्रमाणपत्र व मंडळ अधिकारी शिवळे यांचा स्थानिक चौकशी अहवालाचे आधारे सदरचा आदेश पारित करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्रमाणपत्र कायमस्वरूपी रद्द झालेस व त्यास अंतिमत: प्राप्त झालेस सदरचे आदेश सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत रद्द होणेस पात्र राहतील.
5) सदरचे आदेश म्हणजे परिशिष्ट-अ मधील संदर्भातील खरेदी-विक्री परवानगी संदर्भातील आदेश नसून केवळ परिशिष्ट - अ मधील जमिनीची कुळ कायद्याची कलम 43 ची शर्त शिथिल करणेचे आदेश आहेत.
6) अर्जदार श्री. तुळशीराम अनंता शिरोसे व इतर यांचे कु.मु.धा. म्हणून सौ. सुनिता राहुल पवार राहणार आंबेळे बु., ता. मुरबाड, जि. ठाणे यांनी या कार्यालयास व या कार्यालयाचे चौकशी अधिकाऱ्याकडे सादर केलेली कागदपत्रे खरी व योग्य आहेत असे समजून परिशिष्ट-अ मधील कुळ कायद्याच्या कलम 43 ची शर्त शिथील करणेचे आदेश पारीत करणेत आले आहेत. भविष्यात सदर आदेशविरुद्ध कोणतीही हरकत घेतल्यास तसेच अर्जदार श्री. तुळशीराम अनंता शिरोसे व इतर यांचे कु.मु.धा. म्हणून सौ. सुनिता राहुल पवार, रा.आंबेळे बु., ता मुरबाड, जि. ठाणे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांबाबत भविष्यात काही न्यायालयीन बाब अथवा सदर कागदपत्रे खोटी, बनावट व चुकीची असल्याचे सिद्ध झालेस सदर कागदपत्रांचे आधारे पारित करणेत आलेले प्रस्तुतचे आदेश सक्षम प्राधिकाऱ्या मार्फत रद्द होण्यास पात्र राहतील.
प्रस्तुत मिळकतीचे 7/12 सदरी असलेली कुळ कायदा कलम 43 ची शर्त शिथिल करण्यात यावी असे आदेश पारित झालेने कु का. क.43 ची शर्त शिथिल नोंद दाखल केली असे. (उक्त नमूद कागदपत्र ई फेरफार प्रणालीस अपलोड केले असे. )