सातबारा Watch

← फणसोली

Ferfar #947 · फणसोली

मुरबाड, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
108
Talathi
RUPESH VIJAY MERAT
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभाग सुधारित शासन परिपत्रक क्र टी.एन.सी. 04/2013/ प्र.क्र. 196/ज-1 दिनांक – 07/05/2014 च्या शासन परिपत्रकानुसार मौजे फणसोली ता. मुरबाड येथील सर्वे क्रमांक 108 क्षेत्र 0.50.00 हे.आर. पोटखराब 0.03.00 हे.आर. आकार 0.50 रु.पै. या जमीन मिळकती बाबत मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची शर्थ शिथिल करणे कामी अर्जदार श्री. सखाराम देऊ कोळेकर यांनी अर्ज केला आहे. महाराष्ट्र शासनाचे महसूल व वनविभाग कडील शासन परिपत्रक क्र. टी.एन.सी. 04/2013 प्र.क्र. 196/ज-1 दिनांक 11/2/2014 व सुधारित परिपत्रक क्र. 2 महाराष्ट्र शासनाचे महसूल व वनविभाग सुधारित शासन परिपत्रक क्र टी.एन.सी. 04/2013/ प्र.क्र. 196/ज-1 दिनांक – 07/05/2014 मध्ये ज्या जमिनीच्या संबंधात तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकापासून 10 वर्षाचा काळ लोटला असेल, अशा जमिनींच्या बाबतीत तिची विक्री करण्याकरिता, ती देणगी देण्याकरिता, ती गहाण ठेवण्या करिता, ती पट्ट्याने देण्याकरिता, किंवा तिचे अभिहस्तांकन करण्याकरिता, पुढील शर्तीस अधिन राहून, अशा कोणत्याही पूर्वमंजुरीची आवश्यकता असणार नाही.(क) शेतजमिनीची विक्री करण्यापूर्वी,विक्रेता जमीन महसूल आकारणीच्या 40 पट इतकी नजराणा रक्कम शासनाला देईल, (ख) खरेदीदार हा शेतकरी असला पाहिजे, (ग) खरेदीदार हा महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 अन्वये अनुज्ञेय असलेल्या कमाल क्षेत्रापेक्षा अधिक जमीन धारण करणार नाही, आणि, (घ) मुंबईचा जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबतचा अधिनियम 1947 यांच्या तरतुदीचे उल्लंघन केले जाणार नाही.त्या अनुषंगाने मौजे फणसोली ता. मुरबाड येथील सर्वे क्रमांक 108 क्षेत्र 0.50.00 हे.आर. पोटखराब 0.03.00 हे.आर. आकार 0.50 रु.पै.या मिळकतीबाबत मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 ग अन्वये खरेदी / विक्री होऊन 10 वर्षाचा काळखंड पूर्ण झालेला आहे. त्यामुळे संबंधित कब्जेदार शेतकरी / खरेदीदार यांनी मा. तहसीलदार मुरबाड यांचेकडून जमा रक्कमेच्या विहित लेखा शिर्ष क्र. 029 अन्वये नमूद असलेल्या आकारणीच्या 40 पट, 300/- (अक्षरी तीनशे रुपये मात्र) एवढी रक्कम शासकीय कोषागारात भरणा केलेली आहे. त्यानुसार त्यांस पावती क्रमांक 2563065 प्रदान करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मौजे फणसोली ता. मुरबाड येथील सर्वे क्रमांक 108 क्षेत्र 0.50.00 हे.आर. पोटखराब 0.03.00 हे.आर. आकार 0.50 रु.पै. या जमीन मिळकतीच्या बाबतीत फक्त मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची शर्त शिथिल करण्यात येत आहे. ग्राम महसूल अधिकारी यांनी संबंधित अर्जदाराच्या वर नमूद मिळकतीच्या 7/12 उताऱ्यावर अधिकार अभिलेखात नोंद घेणेबाबतच्या नियमाप्रमाणे मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची शर्त शिथिल करण्याबाबतच्या नोंदी घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. अश्या आशयाचे मा. तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचे कार्यालयाकडील क्र.कुव/कलम 43/शर्त शिथिल/ एस आर/ 41/ 2026 दिनांक – 27/04/2026 रोजीचा आदेश प्राप्त झालेवरून कु.का.क. 43 ची शर्त शिथिल केली असे.