सातबारा Watch

← भोरांडे

Ferfar #692 · भोरांडे

मुरबाड, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
70/1
Talathi
सचिन माधव निर्मळ
First seen
18h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026लिहुन देणार:- साळुबाई यशवंत मेंगाळ रा. भोरांडे, मान्यता देणार रमेश यशवंत मेंगाळ, मारुती यशवंत मेंगाळ (खाता क्रमांक142) यांचे गट/सर्व्हे क्रमांक70/1, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कुंडलिक रामा भगत , (खाता क्रमांक :-219)गट/सर्व्हे क्रमांक 70/1 लागवडीयोग्य क्षेत्र 2.1200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना मा. जिल्हाधिकारी ठाणे यांचे कडील आदेश क्र. मशा./का-4/टे-1/टेनन्सी/एस.आर.-83/2024 जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे दिनांक 01/01/2025 या आदेशातील अटी व शर्तीस अधीन राहून तसेच मा. सह. दुय्यम निंबधक मुरबाड, जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक मरव-9273 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2290000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. आदेशात नमूद अटी व शर्ती खालील प्रमाणे :- १) जमिनीवरील म.ज.म.अधिनियम १९६६ चे कलम ३६, ३६ अ अन्वये हस्तांतरणास बंदी हा शेरा कायम ठेवणेत यावा. २) सदर जमिनीची जमीनमालक व जमीन विकत घेणार यांचे आप आपसांतील साठेकरारानुसार जमिनीची किंमत रक्कम रु.१६,९०,०००/- एवढी होत असून, सन २०२४-२५ चे बाजारमुल्य दर तक्त्यानुसार जमिनीचे मुल्यांकन रक्कम रु. १४,२६,१२४/- इतकी होत आहे. त्याप्रमाणे सर्वात जास्त रक्कम रु.१६,९०,०००/- (अक्षरी सोळा लाख नव्वद हजार मात्र) ही असल्याने खरेदीदार श्री. कुंडलीक रामा भगत, रा.धोधानी, ता. पनवेल, जि. रायगड यांनी आदिवासी जमीन मालक यांना देणेत यावी व त्याबाबत तहसीलदार मुरबाड यांनी खात्री करावी. ३) आदिवासींचे नावे तहसीलदार मुरबाड यांचेसमोर राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडून सदर रक्कम चेकद्वारे त्यांना अदा करणेत यावी. ४) जमीन विकत घेणार यांनी सदर जमिनीचा वापर शेती प्रयोजनार्थ करावयाचा आहे. अन्य प्रयोजनासाठी जमिनीचा वापर केल्याचे निदर्शनास आल्यास, जमीन सरकार जमा करण्यात येईल. ५) सदर जमिनीवर बोजा अगर सरकारी बाकी असल्यास खरेदीदार यांनी जमीन खरेदी करण्यापूर्वी तो निरंक करावयाचा आहे. ६) सदर जमीन खरेदी केल्यानंतर, जमीन खरेदीदार यांचेकडील एकूण धारक क्षेत्र शेतजमीन कमाल मर्यादेपेक्षा जास्त होणार नाही याची तहसीलदार मुरबाड यांनी खात्री करावी. ७) प्रस्तुत जमीन विक्री व्यवहारास जमीन मालकाच्या वारसांची व हितसंबंधितांची काहीएक तक्रार अगर हरकत राहणार नाही, याची तहसीलदार मुरबाड यांनी खात्री करण्याची आहे. ८) जमीन खरेदीदार यांना या कार्यालयाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणासही जमीन हस्तांतरण करता येणार नाही. ९) जमिनीची ठरवून दिलेली एकूण किंमत जमीन विकणाऱ्या खातेदारांस मिळाल्याशिवाय जमिनीचे खरेदीखत करता येणार नाही. १०) जमीन खरेदी करणार यांनी या आदेशाच्या तारखेपासून ६ महिन्याचे आत खरेदीखत केले पाहिजे. खरेदीखत झाल्यानंतर १५ दिवसांचे आत तसे या कार्यालयाकडे कळविले पाहिजे. ११) जमिनीचा प्रत्यक्षात ताबा घेतल्यापासून ६ महिन्याच्या आत शेतीकरिता जमिनीचा वापर सुरु करणेचा आहे. १२) प्रस्तुतची जमीन ही, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ३६, ३६ अ ला पात्र आहे. त्यामुळे सदर जमिनीचे हस्तांतरण करताना शासनाची पूर्व परवानगी घ्यावी लागेल. १३) सदरची विक्री परवानगी ही विक्री करणारे व खरेदी करणारे यांनी दिलेली कागदपत्रे व परिस्थिती खरी समजून तसेच उपविभागीय अधिकारी/तहसीलदार यांनी, शिफारस केल्यानुसार दिली असून कोणत्याही कायद्याचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास जमीन विक्री करणारे व खरेदी करणारे हे सर्वस्वी जबाबदार राहतील. १४) सदर जमिन भूसंपादनात येत नसल्याबाबत उपविभागीय अधिकारी कल्याण विभाग कल्याण यांनी अभिप्राय दिले असून भविष्यात जमीन भूसंपादनात मागणी झाल्यास ती विना तक्रार द्यावी लागेल. १५) भविष्यात उक्त जमिनीचे क्षेत्रावर "वन" संज्ञे बाबतची नोंद आढळल्यास ती संबंधितांवर बंधनकारक राहील. १६) सदर विक्रीमुळे अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कायद्यांचा महाराष्ट्र शेतजमिन, (जमिन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम १९६१, मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम १९४८, मुंबईचा जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबाबत अधिनियम १९४७, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, भारतीय वन अधिनियम १९२७ वन (संरक्षण) अधिनियम १९८० व तद्अनुषंगाने शासन पूरक धोरण, तसेच शासनाचे प्रचलित धोरणांतर्गत इ. शासन निर्णयाचा / शासन धोरणांचा भंग होणार नाही याबाबत तहसिलदार यांनी खातरजमा करावी. याबाबत कोणताही भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास नियमानुसार त्वरीत कार्यवाही करावी. १७) सदरच्या विक्रीमुळे आदिवासी जमिन मालक भुमिहीन होत नाही याची खातरजमा करुन त्यानंतर पुढील कार्यवाही करणेत यावी. १८) प्रश्नांकित जमिनीच्या ७/१२ चे इतर हक्कांमध्ये फेरफार क्र.२०४ नुसार विष्णू बाबाजी घोलप यांचा रक्कम रु.१३२.७४ चा बोजा दाखल आहे. यासंबंधी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, १९४८ नुसार तहसीलदार, मुरबाड यांनी कार्यवाही करावी व त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात यावी. १९) वरील शर्तीचा वा अटीचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास, अथवा अन्य गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यास, सदरचा आदेश रद्द समजण्यात येईल व खरेदीदार/जमीन मालक यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. २०) सदर विक्री परवानगीबाबत फेरफार नोंदवितांना आदिवासी जमीनमालक श्रीम. साळुबाई यशवंत मेंगाळ, रा.आवळेगांव (भोरांडे), ता.मुरबाड, जि.ठाणे यांस जमिनीची अंतीमत: रक्कम मिळाल्याबाबत पूर्ण तपशिल बँकांचे नाव, पासबुक क्रमांक, तारखांसह फेरफारात नोंदविणेत यावा. आदिवासी विक्री परवानगीचा फेरफार तहसीलदार मुरबाड यांनी तपासून तो बरोबर असल्याची खात्री करुन तसे प्रमाणपत्र मंडळ अधिकारी यांना द्यावे. सदर प्रमाणपत्राच्या आधारे फेरफार मंजूर करणेबाबत मंडळ अधिकारी यांनी कार्यवाही करावी. मोबदला रक्कमेचा तपशील खालीलप्रमाणे आहे :- १) साळुबाई यशवंत मेंगाळ :- दि. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, दिनांक 23/05/2024 चेक नंबर/आरटीजीएस नं. 063407 रक्कम रुपये 150000 २) साळुबाई यशवंत मेंगाळ :- दि. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, दिनांक 06/09/2024 चेक नंबर/आरटीजीएस नं. 062524 रक्कम रुपये 100000 ३) साळुबाई यशवंत मेंगाळ :- दि. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, दिनांक 11/03/2026 चेक नंबर/आरटीजीएस नं. UBINJ2670592257 रक्कम रुपये 100000 ४) ) साळुबाई यशवंत मेंगाळ :- दि. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, दिनांक 16/09/2026 चेक नंबर/आरटीजीएस नं. NEFT002978852 रक्कम रुपये 100000 ५) साळुबाई यशवंत मेंगाळ :- दि. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, दिनांक 01/10/2026 चेक नंबर/आरटीजीएस नं. UBIN2026100126274797599 रक्कम रुपये 1240000 ६) रमेश यशवंत मेंगाळ :- दि. ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, दिनांक 01/10/2026 चेक नंबर/आरटीजीएस नं. UBIN2026100126274793036 रक्कम रुपये 300000 ७) मारुती यशवंत मेंगाळ :- महाराष्ट्र ग्रामीण बँक, दिनांक 01/10/2026 चेक नंबर/आरटीजीएस नं. UBIN202610012001796988 रक्कम रुपये 300000 नोंद :- मा. जिल्हाधिकारी ठाणे यांचे कडील आदेश क्र. मशा./का-4/टे-1/टेनन्सी/एस.आर.-83/2024 जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे दिनांक 01/01/2025 या आदेशातील अटी व शर्तीस अधीन राहून तसेच मा. सह. दुय्यम निंबधक मुरबाड, जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक मरव-9273-2026 दिनांक 09-10-2026 व सूची क्र. 2 वरून केली असे.