Ferfar #1024 · राव
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 386/ब/6
- Talathi
- आशिष वसंत किर्तीकर
- First seen
- 20h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
श्री सागर भगवान भंडारी यांनी ग्राम महसुल अधिकारी साझा म्हाडस यांचेकडे मौजे राव ता. मुरबाड येथील गट नं. ३८६/ब/६ या जमीनीच्या ७/१२ च्या इतर हक्कातील श्री काळुराम बाळु भोईर यांचे नाव भोगवटादार सदरी दाखल करणेबाबत अर्ज केला होता. सदर अर्जाच्या अनुषंगाने प्रकरणी मंडळ अधिकारी देहरी यांचे मार्फत चौकशी केली असता त्यांनी संदर्भिय अहवाल या कार्यालयास सादर केला आहे.
प्रकरणी मंडळ अधिकारी यांचेकडील अहवालानुसार ७/१२ इतर हक्कातील श्री काळुराम बाळू भोईर यांचे वारस - कल्पना काळुराम भोईर २) सोनु गणेश सावंत ३) अश्विनी सागर ढमणे ४) मयुरी संतोष सावंत ५) रविना काळुराम भोईर यांची नावे इतर हक्कातुन कमी करुन भोगवटादार सदरी घेवुन त्यांचे क्षेत्र ०.०६.३३ असे दाखल करणे गरजेचे आहे. तसेच सद्यस्थितीत भोगवटादार सदरी दाखल भोगवटादार तानाजी बाळू भोईर यांच्या नावासमोरील सद्यस्थितीतील क्षेत्र ०.३८.० मध्ये दुरुस्ती करुन ते ०.३१.६७ असे करणे गरजेचे आहे. असे नमूद केले आहे. तरी प्रकरणी महाराष्ट्र जमिन महसूल (नोंदवहया तयार करणे व अदयावत करणे) नियम १९७१ मधील तरतुदीनुसार इतर अधिकारातील नावे भोगवटादार सदरी घेवून क्षेत्र दुरुस्तीबाबतची निमोचित कार्यवाही करण्यात आली असे.
(नोंद :- मा.तहसिलदार मुरबाड यांचेकडील क्र.महसूल/हक्कनोंद/टे-२/कावि-५५/२६ दिनांक : 12/10/2026 वरून केली असे.)