Ferfar #555 · तळेखळ
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 40/3
- Talathi
- आशिष वसंत किर्तीकर
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
मौजे तळेखळ, ता. मुरबाड येथील खालील वर्णनाच्या मिळकतीच्या कब्जेदार सदरी श्रीम. विमल यशवंत हेमाडे व इतर, रा.सिध्दगड, पो. नारीवली, ता. मुरबाड, जि. ठाणे यांचे नाव आहे. त्यांनी सदर मिळकत मुंबई कूळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ कलम ३२ग व ३२म प्रमाणे मालकाकडून खरेदी केली आहे. सदर शासन निर्णय क्र.-टिएनसी- ४/१३/प्र.क्र.१९६/ज-१/दिनांक ०७/०५/२०१४ रोजीच्या शासन निर्णयानुसार अर्जात नमुद केलेल्या खालील परिशिष्ट अ मध्ये दर्शविलेल्या जमिनीचे क्षेत्राची मुंबई कूळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम, १९४८ चे कलम ४३ (१) व तद्अनुषंगिक मुंबई कूळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९५६ च्या नियम २५ अ (१) (फ) मधील अटी व शर्तीस अधिन व संदर्भिय परिपत्रक क्र. ४ नुसार तरतुदीस अधिन राहुन शर्त शिथिल परवानगी देणेत येत आहे.
1) सदरच्या आदेशान्वये परिशिष्ट-अ मधील जमिनी संदर्भात महाराष्ट्र कूळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ ची शर्त शिथील करणेत येत आहे.२. सदरच्या आदेशान्वये परिशिष्ट-अ मधील जमिनी संदर्भात महाराष्ट्र कूळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम. ४३ ची शर्त शिथील केल्यामुळे अथवा शर्त कमी केल्यामुळे जमिनीस भोगवटादार वर्ग-१ असा करणेत येत आहे व परिशिष्ट- अ मधील जमीन महाराष्ट्र कूळ वहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे नियंत्रणापासून मुक्त होईल व राहील.
३. गाव नमुना १ (क) मधील नोंदवहीतून परिशिष्ट-अ मधील वगळणेत येत आहे.
४. तहसीलदार तथा शेत जमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचेकडील आदेश क्र.टेनन्सी/एसआर-१४/२०२६, दिनांक १५/०४/२०२३. तसेच सह दुय्यम निबंधक मुरबाड यांचेकडील दस्त क्र.३२०७/२०२६ प्रमाणे खरेदी प्रमाणपत्र व मंडळ अधिकारी देहरी यांचा स्थानिक चौकशी अहवालाचे आधारे सदरचा आदेश पारीत करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने प्रमाणपत्र कायमस्वरूपी रह झालेस व त्यास अंतिमतः प्राप्त झालेस सदरचे आदेश सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत रद्द होणेस पात्र राहतील.
५. सदरचे आदेश म्हणजे परिशिष्ट-अ मधील सदंर्भातील खरेदी-विक्री परवानगी संदर्भातील आदेश नसून केवळ परिशिष्ट-अ मधील जमिनीची कूळ कायद्याची कलम ४३ ची शर्त शिथिल करणेचे आदेश आहेत.
६. अर्जदार श्रीम. विमल यशवंत हेमाडे व इतर, रा.सिध्दगड, पो. नारीवली, ता. मुरबाड, जि. ठाणे यांनी या कार्यालयास व या कार्यालयाचे चौकशी अधिकाऱ्याकडे सादर केलेली कागदपत्रे खरी व योग्य आहेत असे समजून परिशिष्ट-अ मधील कूळ कायदयाच्या कलम ४३ ची शर्त शिथील करणेचे आदेश पारीत करणेत आले आहेत. भविष्यात सदर आदेशाविरूध्द कोणतीही हरकत घेतल्यास तसेच अर्जदार श्रीम. विमल यशवंत हेमाडे व इतर, रा. सिध्दगड, पो. नारीवली, ता. मुरबाड, जि. ठाणे यांनी सादर केलेल्या कागदपत्रांबाबत भविष्यात काही न्यायालयीन बाब अथवा सदर कागपपत्रे खोटी, बनावट व चुकीची असल्याचे सिध्द झालेस सदर कागदपत्रांचे आधारे पारीत करणेत आलेले प्रस्तुतचे आदेश सक्षम प्राधिकाऱ्या मार्फत रद्द होण्यास पात्र राहतील.या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
( नोंद :- मा. उपविभागीय अधिकारी कल्याण उपविभाग कल्याण यांचेकडील आदेश क्र./टे-८-श,शि./मुरबाडएस.आर.क्र.४६/२६ दिनांक ०६/१०/२०२६. अन्वये केली असे.)