Ferfar #1133 · उचले
मुरबाड, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 358
- Talathi
- प्रशांत पंढरीनाथ खाकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
१. मा. महाराष्ट्र शासनाचे महसुल व वन विभागाकडील शासन परिपत्रक क्र. टि.एन.सी. ०४/२०१३ /प्र. क्र. १९६ / ज-१ दिनांक ११/०२/२०१४.
२. मा. महाराष्ट्र शासनाचे महसुल व वनविभाग, सुधारित शासन परिपत्रक क्र. टि.एन.सी. ०४/२०१३/प्र. क्र. १९६ / ज-१ दिनांक ०७/०५/२०१४.
३. मा. महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र. जमीन-२०२५ / प्र.क्र. ३३६ / जमीन -०१ (ई-१३७९२३४) दिनांक १६/०७/२०२६
४. अर्जदार श्री. रहीम हुसेन पटेल यांचा दिनांक ०१/०४/२०२६ रोजीचा अर्ज.
५. कार्यालयीन टिपण्णी मंजूर दिनांक ०५/१०/२०२६
उपरोक्त नमुद शासन परिपत्राकाचे अनुषंगाने मौजे उचले येथील गट क्रमांक 358 क्षेत्र ०.०१.३० हे.आर. पो.खराबा ०.००.२० हे.आर. आकार ०.११ पैसे या जमीन मिळकती बाबत मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ ची शर्त शिथिल करणेकामी अर्जदार यांनी तहसील कार्यालयात अर्ज केला आहे.
परिपत्रक क्र. १ व सुधारीत परिपत्रक क्र. २ मध्ये ज्या जमिनीच्या संबंधात तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांका पासून १० वर्षाचा काळ लोटला असेल, अशा जमिनींच्या बाबतीत, तिची विक्री करण्याकरिता, ती देणगी देण्याकरिता, तीगहाण ठेवण्या करीता, ती पट्याने देण्याकरीता, किंवा तिचे अभिहस्तांकन करण्याकरीता, पुढील शतीस अधिन राहून, अशा कोणत्याही पुर्वमंजूरीची आवश्यकता असणार नाही. तथापि उपरोक्त वाचले मधील क्र. ३. मा. महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र. जमीन -२०२५ /प्र.क्र. ३३६ / जमीन -०१ (ई-१३७९२३४) दिनांक १६/०७/२०२६ नुसार ४० पट नजराणा आकरणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, २०२६ (१५/०४/२०२६ चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने वरील परिशिष्टामध्ये नमुद मिळकती बाबत मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चेकलम ३२ ग अन्वये खरेदी विक्री होऊन १० वर्षाचा काळखंड पुर्ण झालेला आहे. उक्त परिशिष्ट अ मध्ये नमुद जमीन मिळकतीच्या बाबतीत खालील अटी आणि शर्थीस अधिन राहून मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ ची शर्त शिथील करण्यात येत आहे.
(क) खरेदीदार हा शेतकरी असला पाहीजे.
(ख) खरेदीदार हा महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अन्वये अनुज्ञेय असलेल्या कमाल क्षेत्रापेक्षा अधिक जमीन धारण करणार नाही, आणि
(ग) मुंबईचा जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबत या अधिनियम १९४७ यांच्या तरतुदीचे उल्लंघन केले जाणार नाही.
ग्राम महसूल अधिकारी यांनी संबधीत अर्जदाराच्या उक्त परिशिष्टात नमुद मिळकतीच्या ७/१२ उताऱ्यावर, अधिकार अभिलेखात नोंद घेणेबाबतच्या नियमाप्रमाणे मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ ची शर्त शिथील करण्याबाबतच्या नोंदी घेण्याची कार्यवाही करावी.
भविष्यात सदर मिळकतीची खरेदी विक्री / हस्तांतरण करते वेळी खरेदीदार विक्री करणार (रे) यांनी शासनाने ठरवून दिलेल्या सर्व तरतुदींचे पालन करणे आवश्यक राहील. भविष्यात जेव्हा जमिनीची खरेदी-विक्री /हस्तांतरणाचा प्रश्न उद्भवेल म्हणून वरील उल्लेखीत अटी व शर्ती मधील मुद्दा क्रमांक (क) ते (ग) या मुद्यांबाबत संबधित ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी सखोल तपासणी केल्यानंतरच खरेदीदार जमीन खेरदी करण्यास पात्र ठरत असतील तरच उचित कार्यवाही करावी. सदरील आदेशाचे बाबत भविष्यात काही तक्रार प्राप्त झाल्यास किंवा वाद उद्भवल्यास, किंवा अर्जदार यांनी कोणतीही चुकीची माहिती पुरविली असल्यास किंवा माहिती लपविली असल्यास, या बाबतची सर्व जबाबदारी अर्जदाराची असेल व होणाऱ्या कायदेशीर कार्यवाहीस ते पात्र असतील. सदरहू आदेशाची गावदप्तरी अंमलबजावणी १ वर्षाच्या आत करणे बंधनकारक असेल १ वर्ष मुदत पुर्ण झाल्या नंतर सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील.
( नोंद. वर्दी अर्ज, मा. तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचेकडील आदेश क्र. कुव / कलम ४३ /शर्त शिथील/ एस आर/ १२२/२०२६, दिनांक ०६/१०/२०२६ वरून नोंद केली असे.)