सातबारा Watch

← मुरबाड

Ferfar #7024 · मुरबाड

मुरबाड, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
80/3
Talathi
RUPESH VIJAY MERAT
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 महाराष्ट्र शासनाचे महसूल व वन विभाग सुधारित शासन परिपत्रक क्र टी.एन.सी. 04/2013/ प्र.क्र. 196/ज-1 दिनांक – 07/05/2014 च्या शासन परिपत्रकानुसार मौजे मुरबाड ता. मुरबाड येथील सर्वे क्रमांक 80/3 क्षेत्र 0.09.70 हे.आर. पोटखराब 0.00.00 हे.आर. आकार 1.07 रु.पै. या जमीन मिळकती बाबत मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची शर्थ शिथिल करणे कामी अर्जदार श्री. भरत हरी चवळे यांनी अर्ज केला आहे. महाराष्ट्र शासनाचे महसूल व वनविभाग कडील शासन परिपत्रक क्र. टी.एन.सी. 04/2013 प्र.क्र. 196/ज-1 दिनांक 11/2/2014 व सुधारित परिपत्रक क्र. 2 महाराष्ट्र शासनाचे महसूल व वनविभाग सुधारित शासन परिपत्रक क्र टी.एन.सी. 04/2013/ प्र.क्र. 196/ज-1 दिनांक – 07/05/2014 मध्ये ज्या जमिनीच्या संबंधात तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकापासून 10 वर्षाचा काळ लोटला असेल, अशा जमिनींच्या बाबतीत तिची विक्री करण्याकरिता, ती देणगी देण्याकरिता, ती गहाण ठेवण्या करिता, ती पट्ट्याने देण्याकरिता, किंवा तिचे अभिहस्तांकन करण्याकरिता, पुढील शर्तीस अधिन राहून, अशा कोणत्याही पूर्वमंजुरीची आवश्यकता असणार नाही.तथापि मा. महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र. जमीन - 2025/प्र.क्र. 336/जमीन - 01 (ई-1379234) दिनांक 16/07/2026 नुसार 40 पट नजराणा आकरणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, 2026 (15/04/2026 चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने मौजे मुरबाड ता. मुरबाड येथील सर्वे क्रमांक 80/3 क्षेत्र 0.09.70 हे.आर. पोटखराब 0.00.00 हे.आर. आकार 1.07 रु.पै.या मिळकतीबाबत मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32 ग अन्वये खरेदी / विक्री होऊन 10 वर्षाचा काळखंड पूर्ण झालेला आहे. मौजे मुरबाड ता. मुरबाड येथील सर्वे क्रमांक 80/3 क्षेत्र 0.09.70 हे.आर. पोटखराब 0.00.00 हे.आर. आकार 1.07 रु.पै. या जमीन मिळकतीच्या बाबतीत खालील अटी आणि शर्थीस अधिन राहून मुंबई कुळवहिवाट व शेत जमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची शर्त शिथिल करण्यात येत आहे. (क) खरेदीदार हा शेतकरी असला पाहिजे, (ख)खरेदीदार हा महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम, 1961 अन्वये अनुज्ञेय असलेल्या कमाल क्षेत्रापेक्षा अधिक जमीन धारण करणार नाही, आणि, (ग) मुंबईचा जमीन तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रीकरण करण्याबाबतचा अधिनियम 1947 यांच्या तरतुदीचे उल्लंघन केले जाणार नाही. ग्राम महसूल अधिकारी यांनी संबंधित अर्जदाराच्या वर नमूद मिळकतीच्या 7/12 उताऱ्यावर अधिकार अभिलेखात नोंद घेणेबाबतच्या नियमाप्रमाणे मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची शर्त शिथिल करण्याबाबतच्या नोंदी घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. अश्या आशयाचे मा. तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण मुरबाड यांचे कार्यालयाकडील क्र.कुव/कलम 43/शर्त शिथिल/ एस आर/ 111/ 2026 दिनांक – 15/09/2026 रोजीचा आदेश प्राप्त झालेवरून कु.का.क. 43 ची शर्त शिथिल केली असे.