सातबारा Watch

← मालवनी

Ferfar #4788 · मालवनी

बोरीवली, मंबई उपनगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
71/5
Talathi
प्रफुल वसंत इंगळे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- राजेश सी मेघाणी ,सुनिता राजेश मेघाणी - - -रा. मालवनी(खाता क्रमांक60) यांचे गट/सर्व्हे क्रमांक71/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0611 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : कुशाम देवी हरिद्वार , (खाता क्रमांक :-3628)गट/सर्व्हे क्रमांक 71/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0093 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. अंधेरी 5 जिल्हा मंबई उपनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 19955 दिनांक 20/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 5400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. बाजूस दाखल सर्वे नंबरच्या ७/१२ सदरी सुनिता राजेश मेघाणी, राजेश सी मेघाणी यांची नावे दाखल आहेत. सदर मिळकतीच्या एकूण क्षेत्रापैकी १८५.८१ चौ. मी क्षेत्र राजेश सी मेघाणी, सुनिता राजेश मेघाणी यांनी कायमस्वरूपी खरेदीखताने रक्कम रूपये ५४,००,००० /- (रक्कम रु. चौपन्न लाख मात्र) इतक्या रकमेत हरिद्वार रामराज प्रजापती, कुशाम देवी हरिद्वार यांना विकलेली आहे. सदरचे खरेदीखत सह-दुय्यम निबंधक मुंबई- १२ यांचेकडील अनुक्रमांक खंड व पृष्ठ १९९५५/२०२५ दिनांक २०/११/२०२५ रोजी नोंदणीकृत केलेले आहे. तरी नोंदणीकृत खरेदीखतानुसार हरिद्वार रामराज प्रजापती, कुशाम देवी हरिद्वार यांचे नाव १८६ चौ. मी क्षेत्रावर दाखल करणेकरीता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ नुसार या कार्यालयात अर्ज दाखल केला होता त्यानुसार फेरफार क्र ४६७५ अन्वये नोंद घेण्यात आलेली होती. सदर फेरफारावर १. अॅड. श्री. राजेश मेघाणी २. श्रीम. सुनिता राजेश मेघाणी यांनी दि. २०/०३/२०२६ रोजी या कार्यालयात हरकत नोंदवली व सदरचे प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी मा. तहसीलदार बोरीवली यांचे न्यायालयात सादर करण्यात आले. सदर प्रकरणी वेळोवेळी सुनावणी होऊन मा तहसीलदार बोरीवली यांनी आदेश क्र तह/बोरी/टे-१/हक्कनोंद/एसआर-१८/२०२६ दि. ११/०५/२०२६ नुसार आदेश पारित केले आहेत. सदर आदेशानुसार " १. अर्जदार यांचा अर्ज अंशतः मान्य करण्यात येत आहे. २. मौजे- मालवणी, ता. बोरीवली येथील दावा मिळकती संबंधिचा फेरफार क्र. ४६७५ ही नोंद नामंजूर करण्यात येत आहे. ग्राम महसूल अधिकारी मालवणी यांनी त्यानुसार अंमल घ्यावा. ३. ग्राम महसुल अधिकारी मालवणी यांनी सह दुय्यम निबंधक मुंबई १२ यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र. १९९५५/२०२५ दि.२०/११/२०२५ रोजीच्या नोंदणीकृत दस्तऐवजातील नमूद एकूण १८५.८१ चौ.मी. पैकी ५०% क्षेत्रास हरिद्वार रामराज प्रजापती यांचे नाव दाखलं करणेकरीता नव्याने फेरफार नोंद घेऊन मंडळ अधिकारी मावलणी यांनी मंजूर करावा. ४. कुशाम देवी हरिद्वार यांनी ते शेतकरी असलेबाबतचा पुरावासह नोंदणीकृत दस्त क्र. १९९५५/२०२५ दि.२०/११/२०२५ नुसार दावा मिळकतीस नाव दाखल करणेबाबत ग्राम महसूल अधिकारी मालवणी यांचेकडे नव्याने अर्ज दाखल करावा. तरी सदर आदेशातील मुद्दा क्र - ३ नुसार सह दुय्यम निबंधक मुंबई १२ यांचेकडील नोंदणीकृत दस्त क्र. १९९५५/२०२५ दि.२०/११/२०२५ रोजीच्या नोंदणीकृत दस्तऐवजातील नमूद एकूण १८५.८१ चौ.मी. पैकी ५०% क्षेत्रास म्हणजेच ९३ चौ. मी क्षेत्रावर हरिद्वार रामराज प्रजापती यांचे नाव फेरफार क्र- ४७३२ अन्वये दाखल करण्यात आले. तदनंतर सदर आदेशातील मुद्दा क्र- ४ नुसार " कुशाम देवी हरिद्वार यांनी ते शेतकरी असलेबाबतचा पुरावासह नोंदणीकृत दस्त क्र. १९९५५/२०२५ दि.२०/११/२०२५ नुसार दावा मिळकतीस नाव दाखल करणेबाबत ग्राम महसूल अधिकारी मालवणी यांचेकडे नव्याने अर्ज दाखल करावा." असे आदेशीत करण्यात आले होते त्यानुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ नुसार या कार्यालयात अर्ज केला असून सदर मिळकतीच्या खरेदी केलेल्या उर्वरित ५० % क्षेत्रास म्हणजेच ९३ चौ. मी क्षेत्रावर सह-दुय्यम निबंधक मुंबई- १२ यांचेकडील अनुक्रमांक खंड व पृष्ठ १९९५५/२०२५ दि.२०/११/२०२५ रोजीच्या नोंदणीकृत खरेदीखतानुसार कुशाम देवी हरिद्वार यांचे नाव दाखल करणेकरीता नोंद घेण्यात आलेली आहे. (सोबत : नोंदअर्ज, सूची क्र-२, खरेदीखताची प्रत, मा. तहसीलदार बोरीवली यांनी आदेश क्र तह/बोरी/टे-१/हक्कनोंद/एसआर-१७/२०२६ दि. ११/०५/२०२६ रोजीचे आदेश व इतर कागदपत्रे)