Ferfar #311 · मंडाळे
कुर्ला, मंबई उपनगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/11/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/11/2025
अधिकारी : महसूल व वन विभाग
आदेश क्रमांक : एफएलडी –11/2021/प्र.क्र.63/फ-3
आदेश दिनांक : 04/02/2021
बाजूस दाखल केलेल्या सर्व्हे क्रमांक 89/1/1 च्या मिळकतीस लोक हाउसिंग आणि कन्सट्रक्शन लिमिटेड हे नाव नमूद असून इतर अधिकार सदरी फेरफार क्र.296 ने पं.भू.कु.2 पै आरक्षित क्षेत्र 28.95 हेक्टर अशी नोंद करणेत आलेली होती.तसेच सर्व्हे क्रमांक 90/1/1 च्या मिळकतीस महाराष्ट्र सरकार हे नाव नमूद असून इतर अधिकार सदरी तिवराची(मंग्रोज) झाडोरा नष्ट करणे प्रतिबंध आहे.आरकक्षित क्षेत्र 14.720 हेक्टर. संरक्षित वने पं.भू.कु.3 अधिसूचित क्षेत्र 14.720 हेक्टर अशी नोंद करणेत आलेली होती. सदर मिळकती बाबत भारतीय वन अधिनियम,1927 क्रमांक एफएलडी – 11/2021/प्र.क्र.63/फ-3 भारतीय वन अधिनियम, 1927 (1927 चा 16 ) च्या कलम 20 अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून, विभागीय आयुक्त कोकण यांचेकडील अधिसुचना क्रमांक मशा/ कार्या -2/ वने / सी आर -2331/2013 दिनांक 17 सप्टेंबर 2013 च्या अनुषंगाने महाराष्ट्र शासन या द्वारे मुंबई उपनगर जिल्ह्यातील कुर्ला तालुक्यातील सोबतच्या अनुसूचीत विनिर्दीष्ट केलेले क्षेत्र ही अधिसुचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून “राखीव वने" म्हणून घोषीत केले आहे. महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग- चार-अ फेब्रुवारी 5; 2021/माघ16, शके 1942 महसूल व वन विभाग यांचेकडील दि. 04/02/2021 ची अधिसुचनानुसार "राखीव वने " म्हणून नोंद घेतली असे.
(नोंद- महसूल व वन विभाग यांचेकडील क्रमांक एफएलडी –11/2021/प्र.क्र.63/फ-3 दिनांक 04/02/2021, मा.जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांचेकडील पत्र क्र.सी/मुंउजि/कार्या-2 आय/CPL 21734-2025 IN PIL 87-2006/2025 दि.07/11/2025, मा.उपविभागीय अधिकारी,पूर्व उपनगर,मुंबई उपनगर जिल्हा यांचेकडील पत्र क्र.उविअ/पू.उ./अभिलेख नोंदी/कावि-/2025 दि.12/11/2025, मा.तहसिलदार कुर्ला (मुलुंड) यांचेकडील पत्र क्र.तह/कुर्ला/जमीन/कांदळवन/राखीव वन अभिलेख नोंदी/2025 दि.12/11/2025)
अ.क्र गावाचे नाव न.भू.क्र सर्व्हे क्रमांक क्षेत्र(हेक्टर)
1 मंडाळे 2 89/1/1 23.1728
2 मंडाळे 3 90/1/1 14.72