Ferfar #579 · आंबे तर्फे तळोजे
पनवेल, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- बाळासाहेब रेवजी थोरात
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मौजे आंबे तर्फे तळोजे ता. पनवेल जि. रायगड येथील स.न. 24 क्षेत्र 0.66.00 हे. आर. वरील खातेदार श्री. जनार्दन रामू भोईर रा. आंबे तर्फे तळोजे ता. पनवेल जि. रायगड यांच्या नियंत्रीत सत्ता प्रकारच्या जमिनीबाबत मा. अपर तहसीलदार पनवेल यांचे खालील प्रमाणे आदेश झालेले आहे.
सदरची जमीन मिळकतीची मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम, 1948 मधील कलम 32 ग प्रमाणे किंमत ठरविणेत आलेली असुन फेरफार क्र. 272 दि. 21/09/1976 अन्वये कुळांनी संपुर्ण किंमत फेड केलेबाबत नोंद घेणेत आलेली असुन अपर तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधीकरण, पनवेल यांचेकडील 32 म दाखला प्राप्त केला आहे व जमिन नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण केली आहे. सद्यस्थितीत गाव नमुना नं. 7/12 सदरी श्री. ग जनार्दन रामू भोईर व इतर यांचे नाव दाखल आहे. अर्जदार यांनी सादर केलेले अर्ज व प्रतिज्ञापत्र/नोटरी विचारात घेता प्रस्तुत प्रकरणी मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 43 या पोट कलमात नमुद केलेल्या कलमांन्वये तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकांपासुन 10 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असल्यामुळे महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.टिएनसी-4/2013/प्र.क्र.196/ज-1 दिनांक. 07 मे, 2014 मधील तरतुदीप्रमाणे सर्व बाबींची पुर्तता अर्जदार करीत आहेत.
तरी प्रस्तुत मिळकतीवरील कुळ कायदा कलम 43 खालील भोगवटादार वर्ग -2 ची नोंद कमी करुन भोगवटादार वर्ग-1 ची नोंद करणे बाबत मा. अपर तहसीलदार पनवेल यांचे कडील आदेश क्र. कुळवहिवाट/कात-4/एसआर-248/2026 दि. 28/10/2026 प्रमाणे आदेश झालेला आहेत.
सबब वरील नोंद मा. अपर तहसिलदार साहेब पनवेल यांचे कडील आदेश क्र. कुळवहिवाट/कात-4/एसआर-248/2026 दि. 28/10/2026 प्रमाणे नोंद केली असे.