Ferfar #3561 · मोर्बे
पनवेल, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 09/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 31/08/2026
बाजुस दाखल केलेल्या मिळकती संदर्भात विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय दवारा वसंतराज को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.वाशी यांचेकडील पत्रान्वये श्री.अशोक परशुराम तांबोळी (वाणी) यांनी कर्ज घेतलेले असुन सदर कर्जाची पुर्ण परतफेड न केल्याने संस्थेने यांचे विरुध्द मा.उप निबंधक सहकारी संस्था ठाणे यांचेकडे दावा दाखल करुन वसुली दाखला क्र.135/2024 दि.28/03/2024 रोजी प्राप्त केलेला आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 चे कलम 156 (1) व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1961 मधील नियम 107 अन्वये श्री.आनंद गोविंद टक्केकर वसुली अधिकारी यांनी पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत की श्री.अशोक परशुराम तांबोळी (वाणी) यांच्या मौजे मोर्बे येथिल धारण केलेली स.नं.97/5 व 97/1 ही त्यांनी धारण केलेली वैयक्तीक अथवा त्यांना वारसाहक्काने मिळणा-या अथवा वारसहक्काने वर्ग झालेल्या वडिलोपार्जित हिश्याच्या जमीन व इतर स्थावर मालमत्तेवर लवादी थकबाकी रु.2,85,738/- या रक्कमेचा संस्थेच्या नावाचा व इतर अधिकार हक्क यासह बोजाची नोंद करण्यात यावी.
सदरची नेांद विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचे कार्यालय दवारा वसंतराज को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि.वाशी यांचेकडील क्र.एस आर ओ/वसंतराज/406/2026-27 दि.10/08/2026 अन्वये केली असे .