Ferfar #1667 · खानाव
पनवेल, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस मा.अपर तहसिलदार पनवेल यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कात-4/एस आर 239/2026 दि.14/10/2026 अन्वये खालीलप्रमाणे आदेश पारित झाले आहेत.
सदरची जमीन मिळकतीची मुंबई कुळवहीवाट व शेतजमीन अधिनियम, 1948 मधील कलम 32 ग प्रमाणे फेरफार क्र.569 दि.02/12/1968 व फेरफार क्र.1015 दि.11/08/2011 अन्वये किंमत ठरविणेत आलेली असुन फेरफार क्र.598 दि.02/12/1989, फेरफार क्र.1064 दि.05/05/2012 अन्वये कुळांनी संपुर्ण किंमत फेड केलेबाबत नोंद घेणेत आलेली असुन अपर तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधीकरण, पनवेल यांचेकडील 32 म दाखला प्राप्त केला आहे व जमिन नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण केली आहे. सद्यस्थितीत गाव नमुना नं.7/12 सदरी अजय एकनाथ पाटील व इतर यांची नावे दाखल आहेत. अर्जदार यांनी सादर केलेले अर्ज व प्रतिज्ञापत्र/नोटरी विचारात घेता प्रस्तुत प्रकरणी मुंबई कुळवहिवाट व शेतजमिन अधिनियम 1948 चे कलम 43 या पोट कलमात नमुद केलेल्या कलमांन्वये तिच्या खरेदीच्या किंवा विक्रीच्या दिनांकांपासुन 10 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असल्यामुळे महसुल व वनविभाग शासन परिपत्रक क्र. टिएनसी-4/2013/प्र.क्र.196/ज-1 दिनांक 07 मे, 2014 मधील तरतुदीप्रमाणे सर्व बाबींची पुर्तता अर्जदार करीत आहेत.
सबब स.नं.4 वरील कुळ कायदा कलम 43 खालील भोगवटादार वर्ग 2 ची नोंद कमी करुन भोगवटादार वर्ग 1 ची नोंद करणेत आली व स.नं.18/10 च्या इतर अधिकारात “अजय एकनाथ पाटील व इतर यांचे सामाईक एकुण क्षेत्र 0.37.00 हे.आर या क्षेत्रापुरती जमीन भोगवटादार वर्ग १ केली ”असा शेरा ठेवण्यात आला.
सदरची नोंद मा.अपर तहसिलदार पनवेल यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कात-4/एस आर 239/2026 दि.14/10/2026 अन्वये केली असे.
7/12 सदरी अन्य कोणताही बदल करणेत आला नाही.