Ferfar #4032 · नेरे
पनवेल, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 197/1
- Talathi
- रसिला शैलेंद्र पाटील
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजुस दाखल केलेल्या मिळकती संदर्भात मा. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर पनवेल यांचेकडील रेग्युलर मुकदमा नं.२६१/२०११, मधील दि.१६/०३/२०१२ अन्वये खालीलप्रमाणे आदेश पारित झाले आहेत.
वादी (अपिलार्थी )
१.मंदा ज्ञानेश्वर थळे ,२.जयश्री जयवंत म्हात्रे
विरुद्ध (सामनेवाला)
१.रंगनाथ चया उर्फ चरू ठाकूर (व.३)
दावा मिळतीचे वर्णन –
गावाचे नाव – मौजे-नेरे ता. पनवेल, जि. रायगड
गट नं/स.नं/ हि.नं. क्षेत्र चौ.मी .आकार रु.पैसे.
(जुना स.न ३५०/१ )नवीन स.न १९७/१ ०.१२ ९० हे.आर.चौ.मी
मे. दिवाणी न्यायालय पनवेल व. स्तर यांचे कोर्टात रे. मु.नं.२६१/२०११ मध्ये निशानी नंबर २८ च्या तडजोड पुरशीस नुसार दिनांक-१६/०३/२०१२ रोजी खालीलप्रमाणे आदेश पारित केले आहेत-
आदेश
१)वादी यांनी प्रतिवादीविरुध्द सदरचा दावा वाटपाचा व स्वतंत्र ताबा निर्तुटक करुन मिळणेसाठी व दिनांक ०२/०८/२०११ रोजी केलेले व दिनांक १२/०८/२०११ रोजी रजिस्टर्ड केलेले बक्षिसपत्र वादीवर बंधनकाराक नाही असे ठरवून मिळणेसाठी दाखल केला असे.
२)वादी या प्रतिवादी क्रं.१ व २ यांच्याय विवाहीत मुली आहेत तसेच प्रतिवादी क्रं. ३ यांच्या सख्ख्या बहिणी आहेत. त्यामुळे वादी व प्रतिवादी यांनी त्यांच्यामधील वाद कायमचा संपुष्टात आणण्याचे ठरविले आहे. सबब याकामी वादी व प्रतिवादी यांची कोर्टाबाहेर आपअपासात खालीलप्रमाणे तडजोड झालेली आहे
अ)सर्व्हे नं.४०६ हिस्सा नं २ड क्षेत्र ०-६६-५ हे. आर या दावा मिळकतीपैकी १० आर क्षेत्र जमिन वादी नं १ यांच्या हिश्याला देण्याचे व १० आर क्षेत्र जमिन वादी नं.२ यांच्या हिश्श्याला देण्याचे प्रतिवादी यांनी मान्य व कबुल केले आहे व उर्वरित ४६ आर ५ प्रति क्षेत्राची जमिन प्रतिवादी क्रं ४ यांनी घेण्याची आहे. त्या क्षेत्रावर वादी अगर प्रतिवादी क्रं. १ ते ३ यांचा कोणताही हक्क हितसबंध राहणार नाही. सदरच्या २० आर क्षेत्राचे वादी हे पुर्ण मालक झालेले आहेत. सदरचे २० आर क्षेत्र हे वादी यांच्या मालकी वहिवाटीचे व प्रत्यक्ष ताबेकब्जातील झालेले आहे सदरच्या २० आर क्षेत्राच्या मालकी हक्काशी व ताबेकब्जाशी प्रतिवादी यांचा कोणताही हक्क अगर हितसंबंध राहिलेला नाही.
ब)दावा मिळकतीपैकी २० आर क्षेत्र वगळून उरलेल्या क्षेत्रावर वादी यांचा कोणताही हक्क अगर हितसबंध राहिलेला नाही. तसेच प्रतिवादी क्रं.१ व २ यांचे नांवे असलेले घराची मिळकत व प्रतिवादी क्रं.१ ते ३ यांचे कुटुंबातील अन्य कोणत्याही मिळकतीवर वादी यांचा हक्क व हितसंबध राहणार नाही व भविष्यात प्रतिवादी क्रं. १ व २ यांचे नांवे असलेल्या कोणत्याही स्थावर मिळकतीवर वादी वारसा हक्क सांगणार नाहीत. सबब वादी यांनी दावा मिळकतीमधील २० आर क्षेत्राची जमिन घेऊन एकत्र कुटुंबामधील सर्व स्थावर मिळकतीवरील हक्क सोडुन दिलेला आहे.
क) वादी व प्रतिवादी यांनी संयुक्तिकरित्या मे. उपअधिक्षक भूमि अभिलेख पनवेल यांचेकडे दावा मिळकतीची मोजणी करणेसाठी अर्ज करुन दावा मिळकतीचे आकारफोडपत्रक तयार करुन घ्यावयाचे आहे व तसा वादीचे नांवे २० आर क्षेत्राचा स्वतंत्र ७/१२ चा उतारा करुन घ्यावयाचा आहे व उर्वरित ४६ आर ५ प्रति क्षेत्राचा प्रतिवादी क्रं. ४ यांचे नांवे ७/१२ चा उतारा करुन घ्यावयाचा आहे. याकामी होणारा सर्व खर्च वादी यांनी करावयाचा आहे.
ड) दिनांक ०२/०८/२०११ रोजीचे बक्षिसपत्राचे आधारे प्रतिवादी क्रं. ४ यांचे नांवे सदर दावा मिळकतीमधील एकुण क्षेत्रापैकी ४६ आर ५ प्रति इतके क्षेत्राची जमिन प्रतिवादी क्रं.४ यांचे नांवे होण्यास वादीची हरकत नाही.
मे.दिवाणी न्यायालय पनवेल व.स्तर यांचे कोर्टात रे.मु.नं. २६१/२०११ मध्ये निशानी नंबर २८ वर दिनांक-१६/०३/२०१२ रोजी पारित केलेल्या आदेशातील मुद्दा क्रमांक २(ब)पाहता दावा मिळकतीपैकी २० आर क्षेत्र वगळून उरलेल्या क्षेत्रावर वादी यांचा कोणताही हक्क अगर हितसबंध राहिलेला नाही. तसेच प्रतिवादी क्रं.१ व २ यांचे नांवे असलेले घराची मिळकत व प्रतिवादी क्रं. १ ते ३ यांचे कुटुंबातील अन्य कोणत्याही मिळकतीवर वादी यांचा हक्क व हितसंबध राहणार नाही व भविष्यात प्रतिवादी क्रं. १ व २ यांचे नांवे असलेल्या कोणत्याही स्थावर मिळकतींवर वादी वारसा हक्क सांगणार नाहीत. सबब वादी यांनी दावा मिळकतीमधील २० आर क्षेत्राची जमिन घेऊन एकत्र कुटुंबामधील सर्व स्थावर मिळकतींवरील हक्क सोडून दिलेला आहे.सबब वरील तडजोड पुरशीस नुसार वादी क्र.१.मंदा ज्ञानेश्वर थळे,२.जयश्री जयवंत म्हात्रे यांची नावे सदर मिळकती मधून कमी केली असे. सदरची नोंद मे.दिवाणी न्यायालय पनवेल व.स्तर यांचे कोर्टात रे.मु.नं.२६१/२०११ मध्ये निशानी नंबर २८ वर दिनांक-१६/०३/२०१२ लगत मा.अपर तहसिलदार पनवेल यांजकडील पत्र क्र.हक्कनोंद/कात-४/९६४०१९३/२०२६ दिनांक.१४/१०/२०२६ अन्वये दाखल केली असे.