सातबारा Watch

← वडवली

Ferfar #1460 · वडवली

पनवेल, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
33/6
Talathi
प्रिया जितेंद्र वैती
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे खरेदीदार श्री. शंकर बाळाराम खुटले व लक्ष्मण बाळाराम खुटले रा. कुडावे, ता. पनवेल जि. रायगड यांची सदरची जमीन नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण केलेली असून मा. तहसीलदार सा. पनवेल यांच्या वरील उक्त आदेशान्वये मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ या पोट कलमात नमूद केलेल्या कलमांमध्ये तिच्या खरेदीसाठी किंवा विक्रीच्या दिनांकापासून १० वर्षांऐवजी अधिक कालावधी लोटला असल्यामुळे महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र. टीएनसी-४/२०१३/प्र.क्र. १९६/ज-१, दि. ७ मे २०१४ तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र (असाधारण) भाग चार मधील महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, २०२६, दि. १५ एप्रिल २०२६ मधील तरतुदींप्रमाणे शेतजमीन अधिनियम - यात यापुढे, या प्रकरणात, ज्याचा निर्देश, महाराष्ट्र कुळवहिवाट अधिनियम असा केला आहे. याच्या कलम ४३ मध्ये, पोट कलम (1) मधील दुसऱ्या परंतुकातील खंड (क) वगळण्यात आले असल्याने नजराणा रक्कम भरून घेणेची आवश्यकता नसल्याने सदर जमीन मिळकत ही नियंत्रित सत्ता प्रकारातून मुक्त करण्यात आली आहे. त्या कारणाने प्रस्तुत जमीन खुद्द स्वरूपाची होऊन भुधारणा पद्धती वर्ग-१ झाल्याने सदर ७/१२ वरील नियंत्रित सत्ता प्रकारचा शिक्का कमी केला. वरील नोंद मा. तहसीलदार साहेब, पनवेल यांचेकडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद/कात-४/एस.आर. १२७/२०२६ दिनांक १६/१०/२०२६ रोजीच्या आदेशान्वये नोंद केली.