Ferfar #1863 · कसळखंड
पनवेल, रायगड · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 49/1
- Talathi
- विनय चिंतामण पाटील
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 08/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे-कसळखंड,ता.-पनवेल येथील स.नं.49/1क्षेत्र 0.47.80 हे.आर.या जमिन मिळकतीच्या भोगवटादार सदरी निलेश संभाजी पाटील व इतर यांचे नाव दाखल असून इतर अधिकारांत 1) “सक्षम प्राधिकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरा बंदी-भुमिहीन/शेतमजूर/स्वातंत्र सैनिक यांना वाटप जमिन”2) “मालक अज्ञान असल्यामुळे कृषकदिन पुढे ढकलण्यात आला” तसेच 3) “तुकडेबंदी विरूध्द व्यवहार” असे शेरे दाखल असल्याचे दिसून येते.
तदपुर्वी फेरफार क्रमांक 1427 दिनांक 15/04/2013 चे अवलोकन केले असता कु.का.क.32ग अन्वये किंमत निश्चित करून कुळ नितीन संभाजी पाटील व इतर 17 यांचे नांव कब्जेदार दाखल केले व जमिन मालक श्री.पंढरीनाथ राघो पाटील यांचे नाव किंमत घेणार म्हणून इतर हक्कांत दाखल झाल्याचे दिसून येते.तसेच फेरफार क्रमांक 1442 दिनांक 01/08/2013चे अवलोकन प्रमाणे कु.का.क.32ग ची पुर्ण किंमत कुळ नितीन संभाजी पाटील व इतर 17 यांनी पुर्ण फेड केल्याने इतर हक्कांतील जमिन मालक यांचा बोजा कमी झाल्याने दिसून येते.
सदर मिळकतीच्या इतर अधिकारांत “सक्षम प्राधिकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरा बंदी-भुमिहीन/शेतमजूर/स्वातंत्र सैनिक यांना वाटप जमिन”असा शेरा दाखल आहे.त्यासमोर फेर फार क्रमांक 1427 नमुद आहे.परंतु फेरफार क्र.1427 ही.कु.का.क.32ग अन्वये किंमत ठरलेचा आहे.सदर मिळकत ही कुळ कायदयाची असल्याने “सक्षम प्राधिकार्याच्या पूर्व परवानगी शिवाय हस्तांतरा बंदी-भुमिहीन/शेतमजूर/स्वातंत्र सैनिक यांना वाटप जमिन”या ऐवजी सक्षम प्राधिकार्याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरा बंदी कुळ कायदयाने प्राप्त जमिन असा शेरा दाखल केला असे.तसेच सदरहू जमीन मिळकतीचे कुळ कायदा कलम 32ग अन्वये किंमत ठरून कुळ कायदा कलम 32म अन्वये फेड झालेली असल्याने इतर अधिकारातील मालक अज्ञान असल्यामुळे कृषक दिन पुढे ढकण्यात आला असा शेरा कमी केला.
सदरची नोंद मा.तहसिलदार पनवेल यांचेकडील क्र.हक्कनोंद/कात-4/2159/11063/2025 दिनांक 01/10/2026 याप्रमाणे नोंद केली असे.