Ferfar #993 · बारापाडा
पनवेल, रायगड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 14/3, 16/3/4/5/6/ब, 18/3/4/5/अ, 5/1/ब, 8/3/5/9/ब, 9/6
- Talathi
- सचिन हौशिराम शेळके
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026
मौजे बारापाडा, ता. पनवेल येथील स.नं. ५/१/ब, १४/३, १६/३/४/५/६/ब, ९/६, ८/३/५/९/ब, १८/३/४/५/अ या जमिनीच्या अभिलेखात फेरफार क्र. २९८९ दि. १९/११/१९७९ अन्वये मूळ कुळ इब्राहिम महंमद साले दळवी यांच्या मृत्यूनंतर त्यांचे वारस म्हणून खालीलप्रमाणे नावे दाखल होती: १) उमर इब्राहिम महंमद साले दळवी २) हुसेनमिया इब्राहिम म. साले दळवी ३) अब्दुल्ला म. साले दळवी ४) आदम इब्राहिम म. साले दळवी ५) हलीमाबिबी अ. गणी दाखवे ६) फातीमाबीबी महामुद दाखवे ७) मरियम बीबी इब्राहिम मुल्ला ८) लतीफाबीबी शाकीर
सदर वारसांपैकी उमरमिया इब्राहिम दळवी हे मयत झाल्याने त्यांचे वारस फेरफार क्र. ३०१ दि. १२/११/२००४ अन्वये दाखल झाले. त्यानंतर त्यांचे वारस शकील उमरमिया दळवी हे मयत झाल्याने फेरफार क्र. ७४६ दि. १३/११/२०१९ अन्वये त्यांच्या वारसांची नोंद प्रमाणित झालेली आहे.
आता यातील सहहिस्सेदार/वारस श्री. आदम इब्राहिम दळवी (हक्कसोड करून देणार) यांनी मौजे बारापाडा येथील वरील सर्व्हे नंबरमधील आपल्या संपूर्ण अविभक्त हक्क, हिस्सा व हितसंबंधांचे हक्कसोडपत्र खालीलप्रमाणे सहहिस्सेदारांच्या (हक्कसोड करून घेणार) लाभात निष्पादित केले आहे: १) अहंमद उमरमिया दळवी २) म. अकील उमरमिया दळवी ३) अन्वर उमरमिया दळवी ४) मुनव्वर उमरमिया दळवी ५) शकील उमरमिया दळवी (त्यांचे कायदेशीर वारस)
सदर हक्कसोडपत्र हे सह दुय्यम निबंधक वर्ग-२, पनवेल-४ कार्यालयात दस्त क्र. ७६७१/२०१३ दिनांक १९/०८/२०१३ अन्वये नोंदणीकृत झालेले आहे.
त्यानुसार मा. अपर तहसीलदार कार्यालय पनवेल यांचे पत्र क्र. हक्कनोंद/कात-४/५३५/२०२६, दि. ०७/०९/२०२६ अन्वये दिलेल्या निर्देशानुसार, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ चे कलम १४९/१५० मधील तरतुदींनुसार, मौजे बारापाडा येथील स.नं. ५/१/ब, १४/३, १६/३/४/५/६/ब, ९/६, ८/३/५/९/ब, १८/३/४/५/अ या मिळकतींमधून श्री. आदम इब्राहिम दळवी यांचे नाव कमी करून, सदर हिस्सा हक्कसोड करून घेणारे (१) अहंमद उमरमिया दळवी, (२) म. अकील उमरमिया दळवी, (३) अन्वर उमरमिया दळवी, (४) मुनव्वर उमरमिया दळवी व (५) शकील उमरमिया दळवी यांचे वारस यांच्या नावे दाखल करण्यासाठी ही फेरफार नोंद घेतली.