Ferfar #1101 · वावे
कर्जत, रायगड · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/2/क
- Talathi
- वैशाली तुकाराम मान्टे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण कर्जत यांचे न्यायालयात महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम 32 ग अन्वये दावा चालू होता.सदर दाव्याबाबत खालीलप्रमाणे आदेश देण्यात आला आहे.
1.अर्जदार यांनी दिनांक 30/01/2026 रोजी केलेला 32 ग अन्वये किंमत निश्चित करणेकामीचा अर्ज मान्य करण्यात येत आहे.
2.मौजे – वावे ता.कर्जत येथील सर्व्हे नं 31/2/क चे क्षेत्र 0.34.60 हे.आर.,आकार 4.12 रु.पैकी या दावा मिळकतीचे 7/12 उताऱ्यावरील भोगवटादार सदरी असलेले सामनेवाले (जमीन मालाज ) परशराम दामोदर वैद्य यांची नावे कमी करून इतर हक्कातील कुळे – जगदीश रामचंद्र ठाणगे व इतर नावे भोगवटादार सदरी दाखल करावी व वारस नोंदीच्या कायदेशीर तरतुदीनुसार मयत कुळांची वारसनोंद करावी.
3.जमीन मालक- श्री.परशराम दामोदर वैद्य यांचा 32 ग बोजा र.रु.३४२०/- ( अक्षरी तीन हजार चारशे वीस मात्र ) बोजाची नोंद इतर हक्कात घेण्यात यावी.
4.दावा जमिनीची कुळ कायदा कलम 32 ग अन्वये निश्चित खरेदीची संपूर्ण रक्कम रु.३४२०/- ( अक्षरी तीन हजार चारशे वीस मात्र ) भरल्यानंतर कुळकायदा कलम 32 म प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी.
5.सदर जमीन कुळ हे उक्त अधिनियमाच्या कुळकायदा कलम 43 अन्वये नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण करतील.
6.ग्राम महसूल अधिकारी डिकसळ यांनी आदेशाप्रमाणे गाव अभिलेखात नोंद घ्यावी.
7.सदर निर्णय सर्व संबधितांना कळविण्यात यावा.
8.खर्चाबाबत आदेश नाहीत.
सदरची नोंद मा तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण कर्जत यांचेकडील आदेश क्रमांक ३२ग दावा क्र.टेनन्सी/एसआर/05-2026 दिनांक 09/10/2026 च्या आदेशान्वये नोंद केली.