Ferfar #656 · खरवई
खालापुर, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 19/4/2
- Talathi
- शैला बाळासाहेब गवळी
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल केलेली जमीन हि भोगवटादार वर्ग-२ ची असून अर्जदार श्री. सुयश प्रकाश म्हस्के , रा. खरवई, ता. खालापूर, जि. रायगड
महाराष्ट्र शासन राजपत्र दि. १५/०४/२०२६ रोजीचे महाराष्ट्र कुळवहिवाट शेती जमीन अधिनियम मधील सुधारणा मध्ये, कलम ४३ मध्ये, पोट-कलम (१) मधील दुसऱ्या
परंतुकातील खंड (क) वगळण्यात येईल असे नमूद केले आहे. त्यानुसार ४० पट नजराण्याची रक्कम भरणा करणे अनिवार्य नाही. तसेच मा. जिल्हाधिकारी
सो. रायगड-अलिबाग यांचेकडील पत्र क्र. कुळवहिवाट/टी-४/सु.अधिनियम, २०२६/कलम ४३/२०२५ दिनांक २१/०७/२०२६ अन्वये वर नमुद परिपत्रकामध्ये
दिलेल्या निर्देशानुसार कुळ कायदा कलम ४३ च्या अनुषंगाने अधिकार अभिलेखाची पडताळणी करुन कुळांनी जमिन खरेदी केल्याच्या दिनांकापासून
१० वर्षाचा कालावधी पुर्ण झालेला आहे.
प्रस्तुत प्रकरणी मा.तहसीलदार साहेब खालापूर यांचेकडील आदेश क्र.कुळवहिवाट/कात-11/कलम 43/मौजे खरवई/5606/2026/6184 दि. 22/10/2026
प्राप्त झालेवरून प्रस्तुत मिळकतीवरील कुळकायदा कलम ४३ खालील भोगवटादार वर्ग २ ची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग १ करणेकामी नोंद केली.