सातबारा Watch

← वाशी

Ferfar #6398 · वाशी

पेण, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
Certified
—
Gat / Survey
9/2
Talathi
अंकिता दिलीप सावंत
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 बाजूस दाखल केलेली मौजे वाशी, ता. पेण येथील स. नं/ग.नं. 9/2 एकुण क्षेत्र 0.34.10 हे.आर, आकार 3.00 ही मिळकत नियंत्रण सत्ता प्रकारची असून जमीन मालक श्री. विष्णू विठू मोकल , रा-वाशी ता. पेण यांनी फेरफार क्र. ६०७०, दिनांक 29/01/2021 अन्वये किंमत भरल्याची नोंद आहे. तरी शासन परिपत्रक दि. 07 मे २०१४ मधील, तसेच सुधारित शासन परिपत्रक दि. १६ जुलै २०१४ मधील तरतुदीनुसार शेतकर्यास कलम 32 म चे प्रमाणपत्र 10 वर्षांपूर्वी मिळालेले असून शासन परिपत्रक तरतुदीप्रमाणे सर्व बाबींची पूर्तता अर्जदार करीत आहे. उक्त अधिनियामान्वये सदर मिळकती वरील कुळ कायदा कलम 43 खाली भोगवटादार वर्ग-2 ची नोंद कमी करून भोगवटादार वर्ग-1 अशी नोंद जमीन मालक श्री. किशोर नारायण पाटील यांना शासन निर्णय दिनांक 7 मे 2014 मधील तरतुद क्र. क ते ग यांस अधिन राहण्यास सांगून केली मा. तहसिलदार पेण यांचे कडील आदेश क्र.हक्कनोंद/कात-2/कु.का.क.43/एस.आर.नं.157/2026/2894, दि. 03/09/2026 अन्वये नोंद केली. बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.