Ferfar #186 · जुई खुर्द
पेण, रायगड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/4
- Talathi
- स्वप्निल किसन चांदगुडे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
बाजूस दाखल मिळकतीमध्ये अर्जदार श्रीम.शारदा चंद्रकांत घरत, रा. खारपाडा, ता.पेण, जि. रायगड यांनी मौजे जुई खुर्द येथील स.नं.१/४,या मिळकतीचे ७/१२ सदरी असलेल्या नावात दुरुस्ती करुन मिळणेबाबत या कार्यालयाकडे दि.२६/०३/२०२५ अर्ज सादर केला आहे.मा.तहसिलदार सो पेण यांजकडील आदेश क्र.हक्कनोंद/कात-२/४२/२०२६/२८७६ तहसीलदार पेण यांचे कार्यालय,पेण दिनांक १८/०८/२०२६ या मिळकतीच्या भोगवटादार सदरी शारदा काशिनाथ म्हात्रे असे नाव दाखल आहे.परंतू अर्जदार यांनी त्यांचे नाव शारदा काशिनाथ म्हात्रे ऐवजी शारदा चंद्रकांत घरत असे करणेबाबत विनंती केली आहे. सोबत महाराष्ट्र शासन राजपत्र सादर केलेला आहे. तरी महाराष्ट्र शासन राजपत्र RNI No. MAHBIL/२००९/३१८७४, दि.१३ मार्च २०२५ ते १९ मार्च २०२५ अन्वये नोंदणी क्र. M-२४४२४१६८ नुसार शारदा काशिनाथ म्हात्रे ऐवजी शारदा चंद्रकांत घरत अशी दुरुस्ती भोगवटादार सदरी असलेल्या नावात करणे आवश्यक असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम १९७१ नुसार अभिलेख अद्यावत करणे योग्य वाटते. त्यामुळे महाराष्ट्र शासन राजपत्रानुसार मौजे जुई खुर्द येथील स.नं./हि.नं.१/४ या मिळकतीच्या भोगवटादार सदरी दाखल असलेल्या नावात शारदा काशिनाथ म्हात्रे ऐवजी शारदा चंद्रकांत घरत असा बदल करणेत यावा. आदेश क्र.हक्कनोंद/कात-२/४२/२०२६/२८७६ तहसीलदार पेण यांचे कार्यालय, पेण दिनांक १८/०८/२०२६ मिळाले वरून नोंद केली.असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .