सातबारा Watch

← तळबंद

Ferfar #792 · तळबंद

अलिबाग, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
13/2/अ, 15/3/अ/2
Talathi
शिल्पा तुकाराम कवटे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस अपिल क्र. 55/2025 आदेश दिनांक : 28/04/2026 मौजे तळबंद येथील 1) स.न. 13/2/अ क्षेत्र 0.61.50 हे.आर. आकार 9.00 रु.पै. 2) स.नं. 15/3/अ/2 क्षेत्र 0.18.10 हे.आर. आकार 3.00 रु.पैसे या मिळकतीच्या बाबतीत मा. उपविभागीय अधिकारी अलिबाग यांचेकडील आदेश क्र. आरटीएस अपिल क्र. 55/2025 दि. 28/04/2026 नुसार खालीलप्रमाणे आदेश झाले आहेत. 1. निष्कर्षात नमूद कारणास्तव अपिलार्थी यांचे अपिल अंशत: मान्य करण्यात येत आहे. 2. तहसिलदार अलिबाग यांनी मौजे तळबंद, ता. अलिबाग येथील स.न.13/2अ, स.न.15/3/अ/2 या मिळकतीचे उत्तरार्थी क्र. 1 ते 2, 3/2 ते 5 यांनी लेखी कळविल्यानुसार त्यावरील अपिलार्थी यांचे म्हणणे विचारात घेऊन व उत्तरार्थी यांचे उपस्थितीत अधिकार अभिलेख तपासून वाटपाच्या अनुषंगाने नियमोचीत आवश्यक ती कार्यवाही करावी. 3. सदर आदेश मान्य नसल्यास मा. अपर जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे 60 दिवसांच्या आत महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 247 अन्वये अपिल अर्ज सादर करता येईल. 4. खर्चाबाबत आदेश नाहीत. 5. संबंधिताना आदेशाची लेखी समज देण्यात यावी. वरील आदेशान्वये व उपविभागीय अधिकारी अलिबाग यांचे न्यायालयात हक्कनोंद अपिल क्र. 83/2024 दि. 08/11/2025 रोजी केलेले संगनमताने झालेल्या वाटणी पत्राच्या अनुषंगाने स.न.13/2अ ह्या मिळकतीपैकी 0.20.0 हे.आर. इतके क्षेत्र वासंती वासुदेव भोईर यांच्या नावे दाखल केली. तसेच स.न.15/3/अ/2 ह्या मिळकतीपैकी संपूर्ण क्षेत्र 0.18.10 हे.आर. चंद्रभागा दत्तात्रेय वेटकोळी यांचे नावे दाखल करणेबाबत नोंद केली.