Ferfar #630 · विघवली
माणगाव, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे-विघवली ता. माणगाव जि. रायगड येथील गट नं. १७४,१७६,१७९,१८१/२,१८२,१८३,१८६,१८७ व १८९ खाता नं. १८६ या जमिनीबाबत अर्जदार अब्दुला आसीफ सिद्दीकी यांनी मा.तहसीलदार सो. माणगाव यांचेकडे अॅड. आर. के. गुप्ता रजि नं.७७५७ मुंबई यांचेकडील नोटरी रजि. नं. ७५०६ पान नं ५८४ दि.३१/१२/२०१९ रोजी केलेला हिबनामा प्रमाणे ७/१२ सदरी नोंद होणेकामी अर्ज सादर केला आहे. त्या अनुषंगाने मा. तहसीलदार सो. माणगाव यांचेकडील पत्र जा. क्र. हक्कनोंद /कात-५ /६२७३/२०२६, दि.१६/०९/२०२६ आलेवरून तसेच दि. ३१/१२/२०१९ च्या हिबा दस्ताप्रमाणे हिबानामा करून देणाऱ्या व्यक्तीचे घोषणापत्र, हिबानामा स्वीकारल्याचे घोषणापत्र, हिबानामा स्वीकारणाऱ्यास ताबा दिला आहे.
हिबनामा लिहून देणार:- आसीफ निजामुद्दीन सिद्दीकी
हिबनामा लिहून घेणार:- अब्दुला आसीफ सिद्दीकी
हिबनामा लिहून घेणार:- अंजुम आसीफ सिद्दीकी
वरीलप्रमाणे हिबा दस्त आलेवरून मौजे-विघवली ता. माणगाव जि. रायगड येथील गट नं. १७४,१७६,१७९,१८१/२,१८२,१८३,१८६,१८७ व १८९ या ७/१२ सदरी नोंद करणेकामी फेरफार केला असे.