सातबारा Watch

← वीर

Ferfar #966 · वीर

महाड, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
148, 156
Talathi
चंद्रकांत पांडुरंग साळुंखे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 बाजुस दाखल केलेल्या जमिनीचे मा. अपर तहसिलदार व शेतजमिन न्यायाधिकरण सो. महाड यांचे न्यायालयात मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमिन अधिनियम १९४८ चे कलम ७० ब दावा क्र.११/२०२६EQJ Court No-२४/२०२६ दिनांक-११/०५/२०२६ अर्जदार- श्री मूनाफ अमीर अधिकारी रा. नागोठणे ता. रोहा जि. रायगड व वादी - श्री अब्दुल सतार झटाम, श्री अय्यूब ग्यासउददीन झटाम, श्री अकबर अयूब झटाम, श्री अहमद अफजल अय्यूब झटाम, श्री ग्यासउददीन अय्यूब झटाम, श्री महम्मद हसन अय्यूब झटाम सर्व रा. वीर, ता. महाड, जि. रायगड यांनी उपरोक्त वर्णनाचे मिळकतीबाबत मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ७०ब अन्वये या न्यायालयाकडे दावा दाखल केला आहे. अर्जदार यांनी दाखल केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने दि. १७/०४/२०२६ ते दि. ०६/०५/२०२६ दरम्यान वेळोवेळी सूनावणी घेण्यात आलेली आहे. मौजे वीर, ता. महाड, जि. रायगड येथील दाव्यातील मिळकत गट नं. १५६ क्षेत्र १-२९-५० आकार १.७५ व गट नंबर १४८ क्षेत्र २-६४-६० आकार ६.३७ रुपये या मिळकती वादी श्री मूनाफ अमीर अधिकारी हे सन २००५ पासून कूळ हक्काने कसत असून वाद मिळकतीमध्ये श्री मुनाफ अधिकारी यांची कूळ वहिवाट कायम आहे. गेल्या ३० वर्षांपासून वादी/ अर्जदार यांची वाद मिळकतीतील कूळ वहिवाट कायम आहेच याशिवाय वादी यांनी त्यांचे स्वतःचे नावाने सन २०२४-२५ व सन २०२५-२६ मध्ये मिळकतीचे पिकपाहणी सदरी भात व बाल अशी पीके घेतल्याची नोंद केली असून निवासी नायब तहसिलदार महाड यांचे कडील पिकपाहणी आदेशाच्या प्रती न्यायालयाचे अवलोकनासाठी दाव्यासोबत सादर केलेल्या आहेत यावरुन अर्जदार हे गेले ३० वर्षापासून सदर मिळकत कशीत असल्याचे सिध्द होत आहे. सामनेवाला क्र. १ ते ६ हे या न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहिले नसले तरी त्यांनी त्यांचे कायदेशीर अखत्यारी यांचे मार्फत वादी यांचा दावा मान्य असल्याबाबत लेखी पूरशीस या न्यायालयात सादर केलेली आहे. त्यामूळे वाद मिळकतीमध्ये कुळाच्या वहिवाटीला कोणतीही बाधा असल्याचे दिसून येत नाही या निष्कर्शाप्रत हे न्यायालय आलेले आहे. वरील सर्व वस्तूस्थिती व कायदेशीर तरतूदी विचारांत घेऊन, मा सो. तह‌सिलदार तथा शेतजमिन न्यायाधिकरण महाड मोजे वीर, ता. महाड येथील ७० व दावा क्र.२४/२०२६ बाबत पुढील प्रमाणे न्यायनिर्णय देण्यात आला १. वादी यांचा दावा मान्य करणेत येत आहे. २. मौजे वीर, ता. महाड, जि. रायगड येथिल गट नं. १५६ क्षेत्र १-२९-५० आकार १.७५ व गट नंबर १४८ क्षेत्र २-६४-६० आकार ६.३७ रु. पैसे या मिळकतीवर गाव नमूना ७/१२ च्या इतर हक्कांत संरक्षित कूळ म्हणून श्री मूनाफ अमीर अधिकारी यांचे नावाची नोंद करणेत आली.मा.तहसिलदार सो. महाड आदेशावरून नोंद केली असे.