Ferfar #4548 · पाले
महाड, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीचे शासन राजपत्र दि. १५/०४/२०२६ नुसार महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (सुधारणा) अधिनियम, २०२६ व महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र. जम २०२५/प्र.क्र.३३६/जमीन०१/ (ई-१३७९२३४) दि. १६/०७/२०२६ महाराष्ट्र शासन राजपत्र २०२६ अधिनियम क्र. १८ अन्वये महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, २०२६ नुसार कुळ प्राप्त झालेल्या जमिनीबाबत कल ४३ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सदर सुधारणेनुसार कलम ४३ मध्ये (१) मधील, दुसऱ्या परंतुकातील खंड (क) वगळण्यात आला आहे तसेच मा. तहसीलदार सो महाड यांचेकडील जा. क्र. हक्कनोंद/कात-१०/सु. अधिनियम, २०२६/कलम ४३/२०२६ दि.०५/१०/२०२६ रोजीचे पत्रा नुसार सदर मिळकतीवरील नियंत्रित सत्ता प्रकार हा शेरा कमी करून भोगवटादार वर्ग २ ऐवजी भोगवटदार वर्ग १ करण्यात आला.