Ferfar #696 · भोगाव
महाड, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
मौजे भोगाव येथील बाजूस दाखल केलेल्या जमिनी बाबत महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमिन कायदे (सुधारणा) अधिनियम, 2026 अंमलबजावणी करणे बाबत महाराष्ट्र शासन राजपत्र दि. 14/04/2026 नुसार महाराष्ट्र कुळवाहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, 2026 मध्ये करण्यात आलेल्या सुधारणेनुसार व महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र. जमीन-2025/प्र. क्र. 336/जमीन 01/(ई -1379234) दि. 16/07/2026 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार कुळ कायदा कलम 43 च्या अनुषंगाने अधिकार अभिलेखांची पडताळणी करून कुळांनी जमीन खरेदी केल्याचे दिनांकापासून 10 वर्षांचा कालावधी पूर्ण झालेला आहे अशा कुळ कायद्यांतर्गत प्राप्त जमिनीबाबत उक्त तरतुदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेकरिता विशेष मोहीम राबवून अशा शेतकऱ्यांची क्षेत्रीय स्तरावर माहिती संकलित करून सुधारणा तरतुदीनुसार महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा रक्कम न आकारता जमिनी वर्ग 1 करण्याबाबत निर्देश आहेत. त्यानुसार मौजे भोगाव या गावातील बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा. तहसीलदार सो. महाड यांचे कडील जा.क्र./आरटीएस/कात-10/भो. वर्ग 2/भोगाव/2026 दि. 05/10/2026 रोजीचे पत्रानुसार कुळ कायदा कलम 43 नुसार भोगवटदार वर्ग 2 हा नियंत्रित सत्ता प्रकार कमी करून भोगवटदार वर्ग 1 केला असे.