सातबारा Watch

← सवाद

Ferfar #803 · सवाद

पोलादपुर, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
Certified
—
Gat / Survey
209
Talathi
राजेंद्र हरी खाडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/08/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कुळवहिवाट/टी-३/८४९९७/२०२३ आदेश दिनांक : 28/04/2023 श्री.अनंत शांताराम तुर्डे यांनी अर्ज सादर केला आहे की, मौजे सवाद मधील गट क्रमांक २०९ यामधील इतर अधिकारामध्ये त्यांचे वडील शांताराम महादू तुर्डे व आजी द्वारका महादू तुर्डे यांचे नाव आहे आणि कब्जेदार सदरी दि महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक लि. मुंबई सेवा केंद्र पोलादपूर असून मा. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, रायगड - अलिबाग, तहसिलदार (सर्वसाधारण) जिल्हाधिकारी कार्यालय रायगड ह्यांचे पत्र क्र. कुळवहिवाट/टी-३/८४९९७/२०२३, दिनांक २८/०४/२०२३ मधील पत्रामध्ये, महाराष्ट्र शासनाकडून रायगड जिल्हा सहकारी कृषी ग्रामीण बहुउद्देशिय विकास बँकेच्या (भूविकास बँक) कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा उताऱ्यावरील कर्जाच्या बोजाची नोंद कमी करण्यात याव्यात असे नमूद आहे. सदरील गट क्रमांक २०९ वर फेरफार क्र.१२९७ आणि १२९८ दिनांक २२/०२/१९७२ श्री. महादू बेंडू तुर्डे ह्यांनी सदरील सर्व्हे क्रमांक भाडेपट्ट्याने दि महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक लि. मुंबई सेवा केंद्र पोलादपूर - रायगड यांना दिला होता. फेरफार क्र.१२५ दिनांक ०१/१०/१९९५ नुसार खातेदार महादू बेंडू तुर्डे हे दिनांक १६/१०/१९९४ रोजी मयत झाले असून त्यांस वारस पत्नी- द्वारका महादू तुर्डे, वारस मुलगा - शांताराम महादू तुर्डे आणि मुलगी नाही. वारसनोंदवही क्र. १४८ नुसार नावे दाखल आहेत. मा. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग ह्यांचे पत्राची झेरॉक्स प्रत, रायगड जिल्हा सहकारी कृषी, ग्रामीण बहुउद्देशिय विकास बँक मर्या. पेण (अवसायनात) ह्यांचे पत्राची झेरॉक्स प्रत, महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाकडील शासन निर्णय क्रमांक -एलडीबी-१०१५/प्र.क्र.२८(शिकाना)/७-स, दि. ०९/११/२०२२ झेरोक्स प्रत, जुने फेरफार दस्तावेज इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे. सदरील पत्राच्या अनुषंगाने दि महाराष्ट्र राज्य सहकारी कृषी व ग्रामीण विकास बँक लि. मुंबई सेवा केंद्र पोलादपूर - रायगड ह्यांचे नाव कमी केले, तसेच फेरफार क्र. ८००, दिनांक ०८/०९/२०२६ नुसार इतर अधिकारामध्ये नजर चुकीने राहिलेली नावे कमी करून, श्री. महादू बेंडू तुर्डे ह्यांचे वारस मुलगा श्री. शांताराम महादू तुर्डे आणि वारस पत्नी- द्वारका महादू तुर्डे ह्यांचे इतर अधिकार मधील नाव कब्जेदार सदरी नोंद केली.