Ferfar #8200 · थेऊर
हवेली, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- सरला देविदास पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहुन देणार:-
बाळु विठ्ठल गायकवाड यांचे मौजे थेऊर येथील ग.नं. 38 मधील त्यांच्या हिश्यापैकी खरेदी देत असलेले संपूर्ण क्षेत्र 00 हे. 1500आर हे त्यांनी
लिहुन घेणार:
शेषेराव बाबुराव वायकर यांना दुय्यम निबंधक हवेली क्र. 6 यांचेकडील 55/1995 दि- 12/01/1995 प्रमाणे रक्कम रुपये 15000/ खरेदी दिली. तसेच मा. सहसचिव महाराष्ट्र शासन महसुल व वनविभाग यांचेकडील आदेश दि.04/11/2025 अन्वये महाराष्ट्र धारण जमीनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रिकरण करण्याबात अधिनियमाच्या विरुध्द केलेले कोणत्याही जमीनीचे हस्तांतरण किंवा विभाजन मानीव नियमित करणेबाबत कार्यपध्दती विषद केलेनुसार सदरचा दस्त दि.15 आक्टोंबर 2024 पुर्वीचा असलेने सदर जमीनीचे हस्तांतरण किंवा विभाजन हे कोणतेही अधिमुल्य न आकारता नियमाधीन करण्याबाबत निर्देश आहेत. सदर दस्तांची नोंद यापुर्वीच फेरफार क्रमांक 3248 अन्वये धरणेत आलेला असुन इतर अधिकारात एकत्रीकरण कायद्याविरुध्द व्यवहार असा शेरा दाखल आहे. इतर हक्कातील असे शेरे कमी करण्यासाठी आणि इतर हक्कातील खरेदीदाराचे नाव कब्जेदार सदरी घेणेसाठी नव्याने फेरफार घेणेत यावा असे शासन निर्देश नमुद आहेत. तसेच महाराष्ट्र जमीन महसुल संहिता 1966 च्या कलम 149-150 मधील विहीत प्रक्रीयेचा अवलंब करुन झोन दाखला , अर्ज, नोंदणीकृत खरेदी दस्ताची प्रत, पुर्वी तुकडेबंदी कायदयाविरुध्द व्यवहार अन्वये रदद झालेचा फेरफार क्र. 3248 सादर केलेवरुन इतर अधिकारातील नाव कमी करुन शासन महसुल व वनविभाग यांचेकडील दि.04/11/2025 रोजीच्या निर्देशानुसार जमीनीचे हस्तांतरण मानीव नियमित करणेबाबत सबब खरेदी घेणाराचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर कब्जेदार सदरी दाखल केले असे.वरीलप्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे.