सातबारा Watch

← कदमवाक -वस्ती

Ferfar #13802 · कदमवाक -वस्ती

हवेली, पुणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
274
Talathi
अरुण रामभाऊ वेडे
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : आरटीएस /एसआर/१७१/२०२६ आदेश दिनांक : 17/10/2026 मा. तहसिलदार सो, अपर तहसिल कार्यालय लोणीकाळभोर ता.हवेली जि.पुणे यांचेकडील आदेश क्रमांक तुकडेबंदी/आदेश/एस आर/१७१/२०२६ दिनांक ०७/१०/२०२६ नुसार मौजे कदमवाकवस्ती तालुका हवेली जि पुणे येथील जमीन गट नंबर २७४ मधील फ़ेरफ़ार नंबर ३१२७ ( दुय्यम निबंधक हवेली ६ येथील खरेदी खत दस्त क्रमांक ५३१/२०००) रद्द करून इतर हक्कामध्ये नाव दाखल आहे . सदर आदेशाने कब्जेदार सदरी दाखल खरेदी देणार किसनराव मुरलीधर कदम यांचे क्षेत्र कमी करून इतर अधिकारात दाखल खरेदी घेणार हेमंत डॅनियल नॉर्टन हे नाव कब्जेदार सदरी दाखल करणे बाबत महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४ सोमवार नोव्हेंबर ३ २०२५ च्या शासन आदेशाप्रमाणे मा.तहसिलदार अपर तहसिल लोणी काळभोर ता.हवेली जि.पुणे यांचा आदेश झाला आहे . PMRDA यांचेकडील झोन दाखला ZC-0000-HA-2026-0-17276 दि.27/07/2026 वरून दावा मिळकत Residential Zone मधील आहे . महाराष्ट्र तुकडेबंदी व तुकडे जोड कायद्यातील तरतुदीनुसार दावा मिळकत जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन व्यवहार विनामूल्य नियमाधीन करणेचा आदेश झाला असे. मा. तहसिलदार, अपर तहसिल कार्यालय, लोणी काळभोर ता.हवेली जि.पुणे यांच्या आदेशाप्रमाणे इतर हक्कातील नाव कब्जेदार सदरी दाखल केली असे.