Ferfar #5692 · सोनकसवाडी
बारामती, पुणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- शिवप्रसाद वसंत जाधव
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08-10-2026
मा. जिल्हा उपनिबंधक सो सहकारी संस्था, पुणे ग्रामिण, पुणे यांचे कडे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०० व नियम ८५ अन्वये मालमत्ता हस्तांतरणाचे प्रमाणपत्र (र) जा.क. जिउनिग्रा/नापत / एकता/क. १००/ धायगुडे/२०२५/३८६८ दिनांक १४/१०/२०२५ रोजीच्या आदेशाने दिलेला होता. त्यानुसार सदर मौजे-सोनकसवाडी मधील गट नं. १०१ या ७/१२ उताऱ्यावर पतसंस्थेची मालकी हक्कात नोंद होऊन मुळ मालक श्री.किसन निवृत्ती धायगुडे क्षेत्र 00 हे 56 आर यांची नावाची कलम १०० व नियम ८५ निकशानुसार नोंद कमी झाली होती.
एकता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. यांचे पत्र जा. क्र. १५/२०२६ दिनांक ०८/०६/२०२६ व जा. क्र. १६/२०२६ दिनांक ०८/०६/२०२६ नुसार सदर थकबाकीदार यांनी येणे असलेली सर्व रक्कमेचा भरणा केला आहे. सोबतच एकता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या.करंजेपूल ता.बारामती जि. पुणे यांचे नावे झालेली मिळकत मा. जिल्हा उपनिबंधक साो - सहकारी संस्था, पुणे ग्रामिण, पुणे यांचा आदेश रद्द करून मुळ मालक श्री. किसन निवृत्ती धायगुडे रा. सोनकसवाडी यांचे नावे करण्यास संस्थेची काहीही हरकत नाही त्यानुसार सदर मौजे-सोनकसवाडी मधील गट नं. १०१ या ७/१२ उताऱ्यावर मालकी हक्कात मुळ मालक श्री.किसन निवृत्ती धायगुडे क्षेत्र 00 हे 56 आर यांची नावाची नोंद केली असे.
आदेशाची प्रत दप्तरी फायलीस असे.लगत मा.तहसिलदार सो बारामती यांचेकडील पत्र क्र.फौज/कावि/524/2026 दि.11/06/2026 असे.