सातबारा Watch

← काटेवाडी

Ferfar #9728 · काटेवाडी

बारामती, पुणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-13 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
319
Talathi
प्रसाद विजय काळे
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 मौजे. काटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे येथील जमीन गट नं. ३१९ मधील अर्जदार अंजना हनुमंत कढणे व बादशाह बाबुलाल तांबोळी तर्फे कु.मु. सोमनाथ हनुमंत कढणे यांनी ० हे २.५ आर क्षेत्र गटातील खातेदार सुभेदार माधव देवकाते यांचे कडून दुय्यम निंबधक, बारामती यांचेकडील दस्त क्रमांक २०३३/१९९३, दिनांक ०५/०७/१९९३ खरेदीदस्तान्वये खरेदी नोंद गाव दप्तरी फेरफार क्रमांक ३१०० नामंजूर अन्वये इतर हक्कात वस्तीचा हक्क म्हणुन करणेत आलेली आहे. अर्जदार यांनी मा. उपविभागीय अधिकारी, बारामती यांचेकडील बिनशेती आदेश क्रमांक गुंठेवारी/एस आर /११/२०१४, दिनांक १०/०७/२०१४ नुसार मौजे. काटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे येथील गट क्रमांक ३१९ मधील सौ. अंजना हनुमंत कढणे यांचे १ आर (१०० चौ. मी. ) आणि श्री. बादशहा बाबुलाल तांबोळी तर्फे कु. मु. श्री. सोमनाथ हनुमंत कढणे यांचे १.५ आर (१५० चौ. मी.) असे एकत्रित २.५ आर (२५० चौ. मी.) क्षेत्रास गुंठेवारी विकास अधिनियम २००१ अंतर्गत निवासी प्रयोजनासाठी बिनशेती परवानगी घेतलेली असून सदरील बिनशेती २.५ आर (२५० चौ. मी.) भूखंडाची गावदप्तरी फेरफार क्रमांक ७०९६ अन्वये ७/१२ सदरी इतर हक्कामध्ये नोंद करणेत आलेली आहे. तसेच, मा. सहायक संचालक, नगर रचना, बारामती शाखा, बारामती यांचेकडील पत्र जा.क्र. मौजे. काटेवाडी/ता. बारामती/गट नं.३१९/ससंनरबा/४४८ अन्वये गट क्रमांक ३१९ हा गावठाणाचे हद्दीलगत असुन हद्दीपासुन १५० ते ३०० मीटर परिघीय क्षेत्रामध्ये समाविष्ट असल्याचे नमूद आहे. मा. तहसिलदार सो बारामती यांच्याकडील पत्र क्र. जमीन/कावि/१८३९/२०२६ व मा. सहायक संचालक, नगररचना, बारामती शाखा, बारामती यांचेकडील पत्र जा.क्र. मौजे. काटेवाडी /ता.बारामती/ गट नं. ३१९/ससंनरबा/४४८अन्वये मौजे. काटेवाडी, ता. बारामती, जि. पुणे येथील जमिन गट नं. ३१९ या जमिनीवर तुकडेबंदी कॅन्सॉल्डेशन ॲन्ड फ्रेग्रमेन्टेशनचे तरतुदीने झालेले ० हे २.५ आर (२५० चौ. मी.) खरेदीखताचे व्यवहार हस्तांतरण नियमानुकुल करणेबाबत सन २०२५ चा महाराष्ट्र अद्यादेश क्रमांक १० महसूल व वन विभाग दि. ०३/११/२०२५ व सह सचिव, महाराष्ट्र शासन यांचेकडील पत्र क्र. R&FD-३१०६०/(६०)/१३/२०२५- MRF (Desk Lt) (Comp. No. १३३३४४७), दिनांक ०४/११/२०२५ मधील महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण करण्याबाबत अधिनियमाच्या विरुध्द केलेली कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा विभाजन मानीव नियमित करणेबाबतची कार्यपध्दती अन्वये अर्जदार अंजना हनुमंत कढणे व बादशाह बाबुलाल तांबोळी यांची ७/१२ सदरी इतर अधिकरातील बेकायदेशीर झालेली नोंद कमी करुन ही नोंद नियमाकुल करणेत येत आहे. व इतर हक्कातील अंजना हनुमंत कढणे व बादशाह बाबुलाल तांबोळी यांची नावे कब्जेदार सदरी दाखल करणेत आली असे.व संबंधित सर्व कागदपत्रे दप्तरी दाखल असे.