Ferfar #15727 · कळस बुद्रुक
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
मे.सिव्हील जज्ज साहेब ज्यु.डी. अकोले यांचेकडील कोर्टहुकुमनामा क्र./ रे.मु.नं.127/2023 अन्वये वादी संचित बाळासाहेब वाकचौरे, प्र.वादी नं.1] बाळासाहेब लक्ष्मण वाकचौरे, 2] उर्मिला बाळासाहेब वाकचौरे, 3] सिताराम लक्ष्मण वाकचौरे, 4] अप्सरा सिताराम वाकचौरे, 5] अविनाश लक्ष्मण वाकचौरे, 6] सागर बाळासाहेब वाकचौरे, 7] सुषमा मुकेश वाडकर, 8] स्वाती अविनाश थोरात, 9] भाऊसाहेब मनोहर वामन, 10] संपत मनोहर वामन, 11] अशोक मनोहर वामन, 12] तुषार संपत वामन यांच्यामध्ये दि. 09/05/2024 अन्वये तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले असे.
अ] वादी संचित बाळासाहेब वाकचौरे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे कळस बु. ता.अकोले येथील शेतजमीन मिळकत.
1) गट /सर्व्हे .नं. 165/2 पैकी क्षेत्र 0.13.00 हे.आर चौ.मी. पोट.ख. क्षेत्र 0.08.00 हे.आर चौ.मी. आकार 0.30 रु.पैसे
2) गट /सर्व्हे .नं. 165/5 पैकी क्षेत्र 0.38.50 हे.आर चौ.मी. आकार 2.37 रु.पैसे
3) गट /सर्व्हे .नं. 165/6 पैकी क्षेत्र 0.06.00 हे.आर चौ.मी. आकार 0.35 रु.पैसे
ब] प्र.वादी नं.1] बाळासाहेब लक्ष्मण वाकचौरे व प्र.वादी नं.2] उर्मिला बाळासाहेब वाकचौरे यांचे तडजोडीने सामाईक वाटपास आलेली मौजे कळस बु. ता.अकोले येथील शेतजमीन मिळकत.
1) गट /सर्व्हे .नं. 31/2 क्षेत्र 0.08.00 हे.आर चौ.मी. आकार 0.20 रु.पैसे
2) गट /सर्व्हे .नं. 60/1 पैकी क्षेत्र 0.02.00 हे.आर चौ.मी. आकार 0.90 रु.पैसे
क] प्र.वादी नं.3] सिताराम लक्ष्मण वाकचौरे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे कळस बु. ता.अकोले येथील शेतजमीन मिळकत.
1) गट /सर्व्हे .नं. 71/10 क्षेत्र 0.62.00 हे.आर चौ.मी. पोट.ख. क्षेत्र 0.01.50 हे.आर चौ.मी. आकार 0.65 रु.पैसे
2) गट /सर्व्हे .नं. 33/3 क्षेत्र 0.23.00 हे.आर चौ.मी. पोट.ख. क्षेत्र 0.01.00 हे.आर चौ.मी. आकार 1.00 रु.पैसे
3) गट /सर्व्हे .नं. 132/3 क्षेत्र 0.28.00 हे.आर चौ.मी. आकार 1.85 रु.पैसे
ड] प्र.वादी नं.4] अप्सरा सिताराम वाकचौरे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे कळस बु. ता.अकोले येथील शेतजमीन मिळकत.
1) गट /सर्व्हे .नं. 71/3 क्षेत्र 0.30.00 हे.आर चौ.मी. आकार 0.95 रु.पैसे
इ] प्र.वादी नं.5] अविनाश लक्ष्मण वाकचौरे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे कळस बु. ता.अकोले येथील शेतजमीन मिळकत.
1) गट /सर्व्हे .नं. 71/2 क्षेत्र 0.36.00 हे.आर चौ.मी.आकार 1.20 रु.पैसे
2) गट /सर्व्हे .नं. 71/6 क्षेत्र 0.68.00 हे.आर चौ.मी. पोट.ख. क्षेत्र 0.01.50 हे.आर चौ.मी. आकार 1.30 रु.पैसे
3) गट /सर्व्हे .नं. 165/6 पैकी क्षेत्र 0.27.50 हे.आर चौ.मी. आकार 1.70 रु.पैसे
ई] प्र.वादी नं.6] सागर बाळासाहेब वाकचौरे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे कळस बु. ता.अकोले येथील शेतजमीन मिळकत.
1) गट /सर्व्हे .नं. 165/4 पैकी क्षेत्र 0.35.50 हे.आर चौ.मी.आकार 2.08 रु.पैसे
2) गट /सर्व्हे .नं. 165/6 पैकी क्षेत्र 0.06.00 हे.आर चौ.मी. आकार 0.35 रु.पैसे
3) गट /सर्व्हे .नं. 165/2 पैकी क्षेत्र 0.21.00 हे.आर चौ.मी. आकार 0.46 रु.पैसे
स.नं. 71/2 मधील एकत्र कुटुंबाची असलेली एक विहीर, विहीरपाणी, त्यावरील इले. मोटार ही प्र.वादी नं. 5 अविनाशचे नावे असलेले विज कनेक्शन स. नं.71/2 पासुन ते स.नं. 71/10 पर्यंत 1300 फुट लांबीची 4 इंच व्यासाची सायफन याचा वापर प्र.वादी नं. 3 व 4 यांनी निम्मा व प्र.वादी नं. 5 यांनी निम्मा याप्रमाणे करावयाचा आहे. सदर विहीरीचे इले. बिल वादी व प्र.वादी नं. 3, 4 व 5 यांनी सामाईकात निम्मे निम्मे भरावयाचे आहे. स. नं. 31/2 मधील विहीर, सदर विहीरीपासुन 71/3, 71/6, 71/10 मधील ज्याचे त्याचे क्षेत्रात पुर्वी पी. व्ही. सी. सायफन 7000 फुट लांबीची व 4 इंच व्यासाची सामाईकात केलेली आहे. त्यात प्र.वादी नं. 3,4 व 5 यांचा सर्वांचा मिळुन निम्मा हिस्सा आहे. त्यात प्र.वादी नं. 3, 4 चा निम्यारहतील निम्मा व प्र.वादी नं. 5 चा निम्याहीतील निम्मा हिस्सा ठेवलेला आहे. वाटपानंतर ज्याच्या त्याच्या क्षेत्रातील सायफनमध्ये बिघाड झाल्यास त्या दुरुस्तीचा खर्च ज्याने त्याने करावयाचा आहे. परंतु विहीर मोटार विज कनेक्शन याबाबत काही दुरुस्तीचा खर्च आल्यास तो दुरुस्ती खर्च प्र.वादी नं. 3, 4 व प्र.वादी नं. 5 यांनी मिळुन त्यांच्या प्रत्येकी 1/2 हिश्याप्रमाणे निम्मा निम्मा करावयाचा आहे.
स.नं. 34 मधील एक विहीर, विहिरपाणी,त्यावरील इले. मोटार याचा वापर प्र.वादी नं. 1, 2 व 3 यांनी क्षेत्राचे हिश्याप्रमाणे करावयाचा आहे. सदर विहीरीचे इले. बिल हे प्र.वादी नं. 1 ते 3 यांनी हिश्याप्रमाणे भरावयाचे आहे.
स.नं. 165/2 मधील विहीर ही प्रवरा नदीलगत असुन ती प्र.वादी नं. 9 ते 11 यांचे क्षेत्रात आहे. सदर विहीर, विहीरपाणी, त्यावर असलेली इले. मोटार, विज कनेक्शन यामध्ये वादी प्र.वादी नं. 5 व प्र.वादी नं. 6 यांचा सर्वांचा मिळुन 1/2 हिस्सा आहे. व प्र.वादी नं. 9 ते 11 यांचा स.नं. 165/2 मधील विहीर विहीरपाणी यात 1/2 हिस्सा आहे. तसेच सदर विहीरीपासुन स. नं. 165/4, 165/5 मधुन ते स. नं. 165/6 चे क्षेत्रापर्यंत 1000 फुट लांबीची व 4 इंच व्यासाची सायफन आहे. त्यात वादी, प्र.वादी नं. 5 व 6 यांचा निम्मा व प्र.वादी नं. 9 ते 11 यांचा निम्मा हिस्सा आहे. वाटपानंतर बिघाड झाल्यास त्यात दुरुस्तीचा खर्च, विहीर, मोटार, विज कनेक्शन याबाबत काही दुरुस्तीचा खर्च आल्यास तो दुरुस्ती खर्च वादी व प्र.वादी नं. 5, 6 व प्र.वादी नं. 9 ते 11 यांनी मिळुन त्यांच्या प्रत्येकी 1/2 हिश्याप्रमाणे (निम्मा निम्मा) करावयाचा आहे.
प्र.वादी नं. 9 ते 11 यांची प्रवरा नदीलगत विहीर त्यांचे हिश्याचे क्षेत्रात येत असल्याने त्यांनी सदर विहीरीवर जाण्यायेण्यास विहीरीचे वापरास वादी व प्र.वादी नं. 5 व 6 यांना कोणत्याही प्रकारे हरकत अडथळा करावयाचा नाही.
स.नं. 165/2, 165/4, 165/5, 165/6 याच्या वाटण्या पुर्व पश्चीम अशा आहेत. सदर स.नं. 165/2 मधील विहीरीवर जाण्या येण्यासाठी, तसेच कोल्हार घोटी रस्त्यापासून नदीपर्यंत स.नं. 165/2, 165/4, 165/6 मधुन प्र.वादी नं. 5 व 6 व वादी व प्र.वादी नं. 9 ते 11 यांचे जमीनीतुन सर्वांसाठी 10 फुट रुंदीचा रस्ता ठेवलेला आहे. सदर रस्त्याचा वापर सामाईकात वादी व प्र.वादी नं. 5, 6 व प्र.वादी नं. 9 ते 11 यांनी सर्वांनी मिळुन करावयाचा आहे. रस्त्यांचे वापरास कोणीही कोणाला कोणत्याही प्रकारे हरकत अडथळा करावयाचा नाही. त्याबाबत तडजोडीसोबतच्या कच्च्या हात नकाशात रस्ता वादी व प्र.वादी नं. 5, 6 व 9 ते 11 यांच्या सविस्तरपणे वाटण्या नमुद केल्या आहेत. प्र.वादी नं.9 ते 11 यांचे क्षेत्र पुर्व बाजुने असुन वादी व प्र.वादी नं. 5 ते 6 यांचे क्षेत्र पश्चीम बाजुने आहे. दोन्ही मिळकतीमध्ये 10 फुट रुंदीचा दक्षीणोत्तर रस्ता आहे.
दावा कलम 1ब-1 मधील ग्रामपंचायत हद्दीतील स.नं. 60/1 आडाचा मळा या शेतजमीनीतील घर मिळकत नं. 596 ही व दावा कलम 1ब-2 ग्रामपंचायत हद्दीतील स.नं. 31/2 या शेतजमीन मिळकतीतील घर मिळकत नं. 414 या पुर्वीपासुन प्र. वादी नं. 1, 2 च्या नावावर आहेत. त्या त्यांच्याच नावावर या तडजोडीने कायमस्वरुपी ठेवल्या आहेत. त्या घर मिळकतीत प्र.वादी नं. 3 ते 6 व वादीचा काही हितसंबंध किंवा हक्क राहिलेला नाही किंवा भविष्यात मागावयाचा नाही.
स.नं. 165/6 पैकी कोल्हार घोटी रस्त्यालगत वादी व प्र.वादी नं. 6. यांना घर बांधण्यासाठी व गोठ्यासाठी प्रत्येकी 0.06 आर क्षेत्र वाटपात दिले आहे. तसे तडजोडीसोबतचे कच्चा हात नकाशात नमुद केले आहे.
वरीलप्रमाणे वादी, प्र. वादी नं. 1 ते 8 यांचेत आपआपसात तडजोड झालेली स.नं. 165/2, 165/4, 165/5 व 165/6 या मिळकतीबाबत वस्तुस्थिती दर्शविणारा कच्चा हात नकाशा सदर तडजोडीसोबत दाखल केला आहे. तो या तडजोडीचा भाग समजण्यात यावा.
प्र.वादी नं.9 ते 11 हे स.नं. 165/2, 165/4, 165/5, 165/6 या मिळकतीत सहहिस्सेदार आहेत व एकुण क्षेत्रात त्यांचे निम्मे क्षेत्र असल्याने त्यांना दाव्यात सामील केले आहे. स.नं.165/2 पैकी 0.34 आर ख. 0.08 आर हे प्र.वादी नं. 9 ते 11 यांचे नावावर सामाईकात आहे. स. नं.165/4 पैकी क्षेत्र 0.35.50 आर हे प्र.वादी नं.9 याचे आहे. स.नं. 165/5 पैकी क्षेत्र 0.38.50 आर हे प्र.वादी नं.10 याचे आहे. स. नं. 165/6 पैकी क्षेत्र 0.39.50 आर हे प्र.वादी नं.11 याचे आहे. सदरचे क्षेत्र हे कच्या ह हात नकाशात दर्शविल्याप्रमाणे वादी व प्र.वादी नं.5 व 6 यांचे क्षेत्रांचे पुर्व बाजुने आहे.
उर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे असे.
मे.सिव्हील जज्ज साहेब ज्यु.डी. अकोले यांचेकडील कोर्टहुकुमनामा क्र./ रे.मु.नं.127/2023अन्वये व तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील पत्र क्रमांक कावि/आरटीएस/1880/2026 दिनांक 13/10/2026 वरोन नोंद केली असे.