सातबारा Watch

← अकोले

Ferfar #28133 · अकोले

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
167/168/241/254
Talathi
साईनाथ आप्पासाहेब ढवळे
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील आदेश क्र.कावि/जमीन/भोगवटादार वर्ग1/02/2026 दि.15/09/2026 अन्वये पाटबंधारे प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या बाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम 1976,1986 व 1999 नुसार रहिवासी प्रयोजनार्थ भूखंडाचे वाटप करण्यात आले आहे. सदर भूखंड कोणत्याही वर्गाचा असला तरीही प्रकल्पग्रस्तास वाटप झालेल्या भूखंडाचे रुपांतर हस्तांतरण किंवा खरेदी विक्री व्यवहारावर असलेले निर्बंध शासन निर्णय क्र.आरपीए-2019/प्र.क्र.154/र-1 दिनांक 18 मे 2018 अन्वये संपुष्टात आलेले आहेत. मौजे अकोले (सिडफार्म) ता. अकोले येथील स.नं. 167/168/241/254 मध्ये निळवंडे प्रकल्पग्रस्तांना भोगवटादार वर्ग 2 म्हणून निवासी भूखंडाचे वाटप करण्यात आलेले आहे. अर्जदार विलास किसन अवचिते यांनी कब्जा हक्काची रक्कम रुपये 8100/- रुपये सरकारी खजिन्यात भरणा केलेली असल्याने मौजे अकोले (सिडफार्म) ता. अकोले येथील भोगवटादार वर्ग 2 म्हणून वाटप करण्यात आलेली मिळकत स.नं. 167/168/241/254 ची भुधारणा पद्धत भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतर करण्यात आली. मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील आदेश क्र.कावि/जमीन/भोगवटादार वर्ग1/02/2026 दि.15/09/2026 वरोन नोंद