Ferfar #2213 · कोंची
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
मे.सिव्हील जज्ज साहेब सिनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.880/2026 दि.22/10/2026 अन्वये वादी विष्णु भास्कर गिते व प्र.वादी नं.1) अनुसयाबाई भास्कर गिते, 2) दिलीप भास्कर गिते, 3) विमल चंद्रभान गिते, 4) संदिप चंद्रभान गिते, 5) अलका दिलीप खैरे यांचेमध्ये खालीलप्रमाणे तडजोड पुरसीस झाली.
विष्णु भास्कर गिते यांचे वाटपास आलेले मौजे कोंची येथील शेतजमीन मिळकत
गट नं.67/1 पैकी दक्षिणेकडुन दुसरी वाटणी क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.14 रु.पै.
गट नं.67/6 दक्षिणेकडुन चौथी वाटणी क्षेत्र 0.22 हे.आर आकार 0.25 रु.पै.
गट नं.67/8 पैकी दक्षिणेकडील वाटणी क्षेत्र 0.27 हे.आर आकार 0.31 रु.पै.
दिलीप भास्कर गिते यांचे वाटपास आलेले मौजे कोंची येथील शेतजमीन मिळकत
गट नं.67/5 क्षेत्र 0.21 हे.आर आकार 0.30 रु.पै.
विमल चंद्रभान गिते यांचे वाटपास आलेले मौजे कोंची येथील शेतजमीन मिळकत
गट नं.67/7 क्षेत्र 1.00 हे.आर ख.0.13 हे.आर आकार 1.15 रु.पै.
संदीप चंद्रभान गिते यांचे वाटपास आलेले मौजे कोंची येथील शेतजमीन मिळकत
गट नं.67/1 पै.दक्षिणेकडील पहिली वाटणी क्षेत्र 0.11 हे.आर आकार 0.16 रु.पै.
गट नं.67/3 क्षेत्र 0.75 हे.आर ख.0.05 हे.आर आकार 1.15 रु.पै.
गट नं.67/8 पै.क्षेत्र 0.74 हे.आर ख.0.13 हे.आर आकार 0.84 रु.पै.
वरीलप्रमाणे वादी व प्र.वादी यांचेमध्ये तडजोड पुरसीस झाली असून गट नं. 66 मध्ये वादी व प्र.वादी कुटूंबाची व त्रयस्थ भाऊबंद यांचे मालकीची सामाईक विहीर असुन सदर विहीरीमध्ये वादी यांचा 8 आणे हिस्सा व प्र.वादी नं. 2 यांचा 8 आणे हिस्सा मालकी हक्काने राहील. सदर विहीरीतुन पिण्याचे पाणी घेण्याचा प्र.वादी नं.4 यांना पिण्याचे पाणी घेण्यासाठी सर्वस्वी हक्क राहील.
गट नं. 67/4 या विहीरीमध्ये वादी व प्र.वादी कुटूंबियांचे मालकीचे 8 आणे हिश्याने विहीर व पाणी घेण्याचा हक्क आहे. सदर विहीरीतील वादी व प्र.वादी कुटूंबाचा विहीर व पाणी हिश्याचा व सदर विहीरीवरील असलेल्या इलेक्ट्रिक कनेक्शन व इलेक्ट्रिक मोटार इत्यादींचा संपुर्ण सर्वस्वी मालकी हक्क प्र.वादी नं. 4 यास देण्यात आलेला आहे.
गट नं. 67/1 चे पश्चिम दक्षिण कोप-यात पश्चिम बाजुने 10 फुट रुंदीचा रस्ता प्र.वादी नं.4 यांचे पश्चिम बाजुने ठेवलेला आहे. सदरचा रस्ता हा वादी यांचे गट नं. 67/1, गट नं. 67/6, गट नं. 67/8 या क्षेत्रात जाणेसाठी तसेच प्र.वादी नं. 2 यांचे 67/5 या क्षेत्रात जाण्यासाठी गट नं.65 व 66चे पुर्व बाजुने ठेवलेला आहे. सदर रस्त्याचे क्षेत्र हे प्र.वादी नं.4 यांचे गट नं. 67/1 पैकी 0.11 आर क्षेत्रात अंतर्भुत नाही. सदर प्र.वादी नं.4 यांचे मालकीचे गट नं.67/1 पैकी क्षेत्र 0.11 आर हे सदर रस्त्याचे व्यतिरीक्त असुन सदर रस्त्याचे क्षेत्र हे वादी व प्र.वादी नं.2 यांचे हिश्यावर हिश्याप्रमाणे टाकण्यात आलेले आहे. सदर रस्ता फक्त वादी व प्र.वादी नं. 2 यांचे वहिवाटीचे हक्काकरीता आहे. सदर वादी व प्र.वादी नं. 2 यांचे वहिवाटीस प्र.वादी नं.4 यांनी एकमेकांस सदर रस्त्याचे शांततामय कब्जे वहिवाटीवरुन कुठलाही हरकत अडथळा करावयाचा नाही.
गट नं.67 चे दक्षिण बाजुने पुर्व पश्चिम रस्ता असुन वादी व प्र. वादी कुटूंबीय तसेच इतर त्रयस्थ इसम व भाऊबंद वहिवाटीने रस्त्याचा वापर करीत असुन सदर रस्त्याचा वापर करण्यास वादी, प्र.वादी यांनी एकमेकांस भविष्यात कुठलाही हरकत अडथळा करावयाचा नाही सदर तडजोडीमधील गट नं.67/1 पैकी दक्षिणेकडील प्र. वादी नं.4 यांना 0.11 आर क्षेत्र दिले आहे. सदर क्षेत्रालगत उत्तर बाजुने वादी यांना सदर तडजोडीमधील गट नं. 67/1 पैकी 0.10 आर क्षेत्र दिले सदर 0.10 आर क्षेत्रापैकी प्र. वादी नं. 4 यांचे उत्तर बाजुने 0.01 गुंठा (एक) क्षेत्र प्र. वादी नं.4 यांना वापर करण्याचे हक्कासाठी ठेवलेले आहे. सदर क्षेत्र प्र.वादी नं.4 यांना वापरण्याचे हक्कासाठी दिल्याबाबत वादी यांची काहीएक तक्रार राहिलेली नाही.
प्र.वादी नं.1 व 5 यांनी दावा मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क वादी व प्र.वादी नं.2 ते 4 यांचे लाभात सोडून दिला आहे.
मे.सिव्हील जज्ज साहेब सिनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.880/2026 दि.22/10/2026 व मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/2567/2026 दि.23/10/2026 वरोन नोंद