सातबारा Watch

← उंबरी

Ferfar #7104 · उंबरी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-10
Objection until
Certified
—
Gat / Survey
199
Talathi
विक्रम प्रकाश ओतारी
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026 मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील मौजे उंबरी बाळापुर रस्ता केस नं.29/2025 दि.03/12/2025 व रस्ता केस नं.30/2025 संगमनेर दि.21/11/2025 अन्वये वादी व प्र.वादी यांनी आपसात केलेल्या तडजोडी प्रमाणे कार्यवाही करावी याप्रमाणे आदेश पारीत झाला आहे.वादी व प्र.वादी यांचेमध्ये झालेली तडजोड पुरसीस खालीलप्रमाणे 1) अर्जदार यांनी सा.वाला यांचे विरुध्द मामलेदार कोर्ट अॅक्ट कलम 5 प्रमाणे सदरची रस्ता केस दाखल केलेली असून यात गावातील त्रयस्थ मध्यस्थ व इतर नातेवाईक यांनी अर्जदार व सा. वाला यांचेत आपसात तडजोड घडुन आणलेली असून एकमेकांनी एकमेकांच्या विरुध्द असलेल्या सर्व तक्रारी या तडजोडीने कायमस्वरुपी सोडुन दिलेल्या आहेत. अर्जदार व सा.वाले हे एकाच कुटुंबातील आहेत. 2) मौजे उंबरी बाळापुर, ता. संगमनेर येथील वाद मिळकत ही अर्जदार व सा.वाला यांची वडिलोपार्जित मिळकत असून अर्जदार यांनी अर्जासोबत दाखल केलेला कच्चा हातनकाशा अर्जदार व सा. वाला यांनी मान्य व कबुल आहे. 3) अर्जदाराने अर्जात कथन केल्याप्रमाणे उंबरी बाळापुर शिवरस्त्यावरुन उत्तरेकडे प्रवरा डावा कालवा या दरम्यान पश्चिम बाजुने गट नं. 199 मधील अंतर्गत 12 फुट रुंदीचा दक्षिणोत्तर रस्ता खुला करून मिळण्याबाबत अर्जदार यांनी अर्जात मागणी केलेली होती. त्याप्रमाणे उंबरी बाळापुर शिवरस्त्यावरुन उत्तरेकडे जाणारा 12 फुट रुंदीचा रस्ता सा.वाला नं. 4 याचे मिळकतीचे पश्चिम बाजुने पुढे जाऊन अर्जदार यांचे मिळकती पासुन पुढे उत्तरेकडे सा.वाला नं. 3 आणि त्यानंतर सा.वाला नं. 2 यांचे मिळकतीपर्यंत सदरचा रस्ता सा.वाला व अर्जदार यांनी कबुल केलेला असून नविन रस्ता या तडजोडीने तयार केलेला आहे. 4) सदरच्या रस्त्यास गट नं. 199 मध्ये अंतर्गत मोजुन मापुन पोल लावण्याचे ठरलेले असून सदरच्या रस्त्यावर मुरुम टाकुन रस्ता मजबुत करून अर्जदार व सा. वाले यांचेकरीता यापुढे कायमस्वरूपी अस्तित्वात येणार आहे. 5) गट नं. 199 ची अर्जदार व सा.वाले यांनी भविष्यात अतितातडीची सामाईकांत स्वखर्चाने मोजणी करावयाची असुन मोजणी अंती सदरच्या रस्त्यास ज्याने त्याने आपल्या वडीलांच्या हिश्याप्रमाणे क्षेत्र सोडावयाचे आहे असे या तडजोडीने ठरले आहे. वरीलप्रमाणे झालेल्या तडजोडीप्रमाणे ठरलेल्या रस्त्याची नोंद 7/12 चे इतर हक्कात घेण्यात आली असे. मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील मौजे उंबरी बाळापुर रस्ता केस नं.29/2025 दि.03/12/2025 व रस्ता केस नं.30/2025 संगमनेर दि.21/11/2025 व मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/कु.का/1673/2026 दि.01/10/2026 व क्र.कावि/कु.का/1674/2026 संगमनेर दि.01/10/2026 वरोन नोंद