Ferfar #8794 · आश्वी बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
न्यायालयीन हुकुमनामा :
मे.सिव्हील जज्ज साहेब सिनियर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्ट हुकुमनामा रे.मु.न. 396/2026 दि.09/05/2026 व मा. तहसिलदार साहेब यांचेकडिल पत्र क्र.कावि/आरटीएस/1690/2026 संगमनेर दि.17/07/2026 प्रमाणे मौजे आश्वी ता.संगमनेर येथिल वादी 1) विजय ठकाजी वाकचौरे प्र.वादी 1) ठका केसू उर्फ केशव वाकचौरे २) सुमन ठकाजी वाकचौरे ३) संपत ठकाजी वाकचौरे यांचे मौजे आश्वी बु.ता. संगमनेर येथील गट नं. 340/1, 343/9, 338,343/6 या मिळकतींच्या क्षेत्राचे पुढीलप्रमाणे वाटप झाले.
1)वादी-विजय ठकाजी वाकचौरे यांचे हिस्स्यास आलेली मिळकत मौजे आश्वी बु. येथील शेतजमिन मिळकत
अ) गट नं. 338 पै. 0.59 क्षेत्र 1.92 रु.पै. यास चतु:सिमा पुर्व 343/9, दक्षिण 338 पै. संपत ताजणे यांची मिळकत, पश्चिम-338 पै. प्र.वादी नं. १ हिस्स्यास आलेले क्षेत्र उत्तर 339;
ब)गट नं. 343/9 क्षेत्र 0.03 हे.आर आकार 0.08 रु.पै. पुर्व सायपन रस्ता, दक्षिण गट नं. 343/9 पै. संपत ताजणे यांची मिळकत, पश्चिम 338 पै. उत्तर 343 सोमनाथ डेंगळे यांची मिळकत.;
2)प्र.वादी नं.१ ठकाजी केसू वाकचौरे यांचे हिस्स्यास आलेली मिळकत गट नं. 338 पै. 0.32 हे.आर, आकार 1.05 रु.पै.चतु:सिमा -पुर्व -गट नं. 338 पै वादी यांचे हिस्स्यास आलेले क्षेत्र,दक्षिण-गट नं. 338 पै. संपत ताजणे यांची मिळकत, पश्चिम-गट नं. 338 पै. उर्वरीत क्षेत्र, उत्तर गट नं 339;
3)प्र.वादी नं. ३ संपत ठकाजी वाकचौरे यांचे हिस्स्यास आलेली मिळकत गट नं. 340/1 क्षेत्र 0.58, पो.ख. 0.00.50 आकार 1.95 रु.पै.पुर्व- गट नं. 343/6, दक्षिण गट नं. 339, पश्चिम-ओढा, उत्तर -गट नं. 340/2 पांडूरंग वदक यांची मिळकत गट नं. 343/6 पै. 0.20 हे.आर, आकार 0.73 रु.पै. यास चतु:सिमा पुर्व सायपन रस्ता, दक्षिण 343/6 पै. नितीन मदने यांची मिळकत, पश्चिम गट नं. 340, उत्तर गट नं. 343/6 पै.;
प्र.वादी नं. २ हिच्या नावे असलेला सामाईक अविभक्त हिस्सा. येणेप्रमाणे शेतजमीन मिळकती त्यातील वस्तु झाडेझुडूपांसह. दाव्याचा मुळ पुरुष ठकाजी केसू वाकचौरे असून प्र.वादी नं. २ सुमन ही त्यांची पत्नी आहे. त्यांना वादी विजय व प्र.वादी नं. ३ संपत ही दोन मुले आहे. प्र.वादी नं. २ सुमन ठकाजी वाकचौरे ही महिला असून वयोवृध्द असून त्यांना शेतातील कामे होत नाही. त्यांची दोनही मुले अत्यंत कष्टाळू, प्रमाणिक असू ते कुटुंबातील जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पार पाडतात. तसेच वादी व प्र.वादी नं. ३ त्यांचा व्यवस्थित सांभाळ करतात, औषधोपचार, पालन-पोषण करतात, मानपान ठेवतात. म्हणून दावा मिळकतीमधील असणारा हिस्सा, हक्क प्र.वादी नं. २ यांनी वादी व प्र.वादी नं. ३ च्या लाभात सोडून दिलेला आहे.
या तडजोडीमध्ये दावा मिळकत गट नं. 338 पै. विहीरीसाठी ठेवलेले पश्चिमेकडील बाजूने उर्वरित 0.02 गुंठे क्षेत्र व त्या क्षेत्रामध्ये असलेली एक विहीर व त्यातील पाणी, विज कनेक्शन याचा वापर वादी विजय ठकाजी वाकचौरे, प्र.वादी नं. १ ठकाजी केसू वाकचौरे व प्र.वादी नं. ३ संपत ठकाजी वाकचौरे यांनी सामाईक पध्दतीने करावयाचा आहे. तसेच प्र.वादी नं. १ यांचे हिस्स्यास आलेल्या क्षेत्रामध्ये जाण्या-येण्यासाठी गट नं. 338 पै. मिळकतीच्या पश्चिमेकडून दक्षिण बाजूने रस्ता ठेवण्यात आलेला आहे.
उर्वरीत तपशिल कोट हुकुमनाम्याप्रमाणे असेल.
मे.सिव्हील जज्ज साहेब सिनियर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्ट हुकुमनामा रे.मु.न. 396/2026 दि.09/05/2026 व मा. तहसिलदार साहेब यांचेकडिल पत्र क्र.कावि/आरटीएस/1690/2026 संगमनेर दि.17/07/2026 प्रमाणे नोंद.