सातबारा Watch

← चणेगांव

Ferfar #5912 · चणेगांव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
33, 49, 53, 54
Talathi
अनुपमा शिवाजी गांगुर्डे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026 मे.सिव्हील जज्ज साहेब ज्यु.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा / रे.मु.नं. 304/2024 अन्वये वादी दिपक शिवाजी ढमक, प्र.वादी नं. 1] शिवाजी बाबुराव ढमक, 2] इंदुबाई शिवाजी ढमक, 3] शरद शिवाजी ढमक, 4] रामनाथ लक्ष्मण ढमक, 5] ओंकार मुरलीधर ढमक, 6] किसन बाबुराव पाटोळे, 7] हौशाबापु बाबुराव पाटोळे, च्यामध्ये दि. 27/07/2024 अन्वये तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले असे. अ] वादी दिपक शिवाजी ढमक यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे चणेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 33 क्षेत्र 0.35.00 हे.आर चौ.मी. आकार 2.60 रु.पैसे संपुर्ण वाटणी 2) गट /सर्व्हे .नं. 49 क्षेत्र 0.46.00 हे.आर चौ.मी. आकार 1.80 रु.पैसे संपुर्ण वाटणी 3) गट /सर्व्हे .नं. 53 पैकी क्षेत्र 0.02.00 हे.आर चौ.मी. आकार 0.08 रु.पैसे संपुर्ण वाटणी 4) गट /सर्व्हे .नं. 54 पैकी क्षेत्र 0.15.00 हे.आर चौ.मी. आकार 0.75 रु.पैसे मधली दक्षीण उत्तर वाटणी ब] प्र.वादी नं. 1] शिवाजी बाबुराव ढमक व प्र.वादी नं. 2] इंदुबाई शिवाजी ढमक यांचे तडजोडीने सामाईक वाटपास आलेली मौजे चणेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 54 पैकी क्षेत्र 0.20.00 हे.आर चौ.मी. आकार 1.25 रु.पैसे पुर्वेकडील दक्षीण उत्तर वाटणी क] प्र.वादी नं. 3] शरद शिवाजी ढमक यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे चणेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 54 पैकी क्षेत्र 0.78.00 हे.आर चौ.मी. आकार 3.58 रु.पैसे पश्चीमेकडील दक्षीण उत्तर वाटणी येणेप्रमाणे दावा मिळकत वादी व प्र.वादी यांनी त्यातील विहीरपाणी हिस्सेवारीप्रमाणे घेण्याचे हक्कासह वाटुन विभागुन प्रत्यक्षात कब्जेवहिवाटीत घेतली आहे. यापुढे कोणीही एकमेकांचे वहितीला व जाण्यायेण्याला हरकत अडथळा करावयाचा नाही. हे वादी व प्रवादी यांना मान्य व कबुल आहे. प्र.वादी नं. 4 ते 7 यांची नावे दावा मिळकत गट नं. 33 व 49 चे इतर हक्कात 7/12 ला त्यांचे जाण्यायेण्याचे रस्या.ासाठी व विहीर पाण्याकरिता असल्याने त्यांना सदर दाव्यात नेसेसरी पार्टी म्हणुन सामिल केले आहे. प्रत्यक्षात त्यांचा दावा मिळकत क्षेत्राशी काहीएक हक्क व हितसंबंध नाही. त्यामुळे त्यांना दावा मिळकतीत काहीएक हिस्सा वाटा मागणे नाही. सदर दावा मिळकतीचे वादी व प्र.वादी नं. 1 ते 3 मध्ये झालेले वाटप हे त्यांना मान्य व कबुल आहे. त्यास त्यांची पुर्ण संमती आहे. प्र.वादी नं. 1 व 2 यांना सदर वाटपात आलेली दावा मिळकत गट नं. 54 पैकी क्षेत्र 0.20 हे आर हे त्यांचे हयातीनंतर वादी दिपक शिवाजी ढमक यांचे मालकी हक्काचे होणार असल्याने ते त्यांनी प्र.वादी नं. 1 व 2 यांचे हयातीनंतर त्यांचे नावे या तडजोडीअन्वये करुन घ्यावयाचे आहे. हे प्र.वादी नं. 3 शरद शिवाजी ढमक यांना मान्य व कबुल आहे. उर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे असे. तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक कावि/आरटीएस/2565/2024 दिनांक 09/10/2024 चे पत्रामध्ये मार्गदर्शक सूचना क्रमांक 11 अन्वये मौजे चणेगाव येथील प्रस्तुत रे.मु.नं. 304/2024 ची नोंद करतांना तुकडेजोड तुकडे बंदी कायद्याचा भंग होऊ नये म्हणून अर्जदार यांनी सदर क्षेत्र सामाईकात ठेवणे बाबत प्रतिज्ञापत्र सादर केलेले आहे त्यानुसार ग.नं. 54 क्षे. 1.13 हे.आर हे वादी दिपक, प्र.वादी नं. 1] शिवाजी, प्र.वादी नं. 2] इंदुबाई, प्र.वादी नं. 3] शरद यांचेमध्ये सामाईक मध्ये दाखल केले असे. मे.सिव्हील जज्ज साहेब ज्यु.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा / रे.मु.नं. 304/2024 अन्वये व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक कावि/आरटीएस/2565/2024 दिनांक 09/10/2024 वरोन नोंद केली असे.