Ferfar #28660 · घुलेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
मा. उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 258 अन्वये पुनर्विलोकन अर्ज नं.556/2025 दिनांक 01/10/2026 अन्वये वादी महाराष्ट्र शासन व प्र.वादी नं.1. सदाशिव विठ्ठल पानसरे, 2. सुमन प्रकाश पानसरे, 3. संतोष प्रकाश पानसरे, 4. वैशाली कैलास पानसरे, 5. रुपाली सचिन शिंदे, 6. बाळासाहेब प्रकाश पानसरे, यांनी मौजे घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर 240/2 क्षे. 1.62.00 हे.आर चौ.मी. व सर्व्हे नंबर 240/3 क्षे. 1.61.00 हे.आर चौ.मी. या वादातील मिळकती संदर्भात तत्कालीन उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांनी त्यांचेकडील आरटीएस अपील नं.09/2022 मध्ये दिनांक 25/03/2022 रोजी आदेश पारीत केलेला आहे. सदर आदेशाचे पुनर्विलोकन करण्यास मा. अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांनी त्यांचेकडील क्र. कावि/अपिल/2025/ई-2494482 नुसार परवानगी दिलेली आहे. त्यानुसार पुढीलप्रमाणे निकालपत्र पारित करण्यात आले.
1. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 258 अन्वये घेतलेला हा पुनर्विलोकन अर्ज मंजूरकरण्यात येत आहे.
2. तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी आरटीएस अपील नं. 09/2022 मध्ये दिनांक 25/03/2022 रोजी पारीत केलेला आदेश रदद करण्यात येत आहे.
3. मौजे घुलेवाडी, ता. संगमनेर येथील फेरफार नं. 4027 कायम ठेवण्यात येत आहे.
4. मौजे घुलेवाडी येथील जुना स.नं. 477/ नवीन गट क्र. 240/1, 240/2, 240/3, 162, 179 या सर्व जमिनींच्या कब्जेदार मालक सदरी इनाम वर्ग-3 देवस्थानची नोंद कायम राहील व प्र.वादीं नं. 1 ते 6 यांची नावे नियमानुसार इतर हक्कात दर्शवण्यात यावीत.
असे आदेशित झालेने ग.नं 240/2, 240/3 या 7/12 उताऱ्यावरील उपविभागीय अधिकारी यांनी आरटीएस अपील नं. 09/2022 मध्ये दिनांक 25/03/2022 रोजी पारीत केलेला आदेश रदद करण्यात येऊन फेरफार नं. 4027 कायम ठेवण्यात आला त्यानुसार ग.नं 240/2 क्षे. 1.62 हे.आर, 240/3 क्षे. 1.61 हे.आर चे अधिकार अभिलेखात श्री.सदगुरु पुरुषोत्तम महाराज देवस्थान यांची नोंद घेऊन प्र,वादी नं.1 ते 6 यांची नावे इतर अधिकारात दाखल केली असे.
मा. उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग संगमनेर यांचेकडील पुनर्विलोकन अर्ज नं.556/2025 दिनांक 01/10/2026 चे आदेशावरोन नोंद केली असे.