सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51560 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
106/183
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 कन्फर्मेशन डीड लिहून देणार :- 1. विक्रम रमेश काबरा स्वत:साठी व लिहून देणार सतिष राधाकिसन मणियार, जितेंद्र राधाकिसन मणियार, केदार राधाकिसन मणियार, मनोज नंदलाल बुब यांचे मुखत्यार म्हणुन, 2. विनयकिशोर बिहारीलाल मणियार तर्फे मुखत्यार अमित विनयकिशोर मणियार, 3.अनिष कमलकिशोर मणियार स्वत:साठी व लिहून देणार अचला जितेंद्र झंवर यांचे मुखत्यार म्हणुन, 4. मनिष नंदकिशोर मणियार स्वत:साठी व लिहून देणार सुशिला नंदकिशोर मणियार लिहून देणार ज्योती प्रदिप सारडा लिहून देणार श्यामसुंदर नंदकिशोर मणियार यांचे मुखत्यार म्हणून, 5. आनंद कमलकिशोर मणियार, यांनी लिहून घेणार :- सुमती विश्वनाथ शिंदे, यांना मौजे संगमनेर बु. येथील स.नं. 106/183 क्षेत्र 100.00 चौ.मी., नमुद संपुर्ण मिळकतीमध्ये लिहून देणार यांचा 28.33% हिस्सा असून त्याबाबत हा दस्त केला आहे सदर मिळकतीचे कब्जेदार सदरी पुर्वी लिहून देणार यांचे कुटूंबाचे मुळ पुरुषांचे / वडिलोपार्जित नावाची नोंद होती, पुढे लिहून देणार यांचे मुळ पुरुष मयत झाल्यानंतर लिहून देणार यांचे नावाच्या वारस नोंदी वर नमुद मिळकतींचे कब्जेदार सदरी झालेल्या आहेत. लिहून देणार अथवा त्यांचे वालीवारसांना वर नमुद मिळकतीमधील हिश्याबाबत लालसा नव्हती व भविष्यातही येणार नाही. वरिलपैकी मयत गंगाबिसन, पन्हालाल, गोविंदराम, श्रीकिसन राधाकिसन मणियार, सुशिला राधाकिसन मणियार, सुरेखा रमेश काबरा यांना ज्याचे त्याचे फांदीचे घटक या नात्याने लिहून देणार हेच कायदेशिर वारसदार व हक्कदार आहेत. लिहून देणार यांची लिहून घेणार यांचे खरेदीखतास संमती असल्याने लिहून देणार यांनी त्यांचे वर नमुद मिळकतीमधील सर्व हक्क, अधिकार लिहून घेणार यांचे लाभात या दस्ताने सोडून दिले आहेत, सबब आता वर नमूद नमुद मिळकतीशी लिहून देणार अथवा त्यांचे वालीवारसांचा काही एक हक्क व हितसंबंध राहिलेला नाही. त्या अनुषंगाने लिहून देणार यांचेसह मयत गंगाबिसन, पन्हालाल, गोविंदराम, श्रीकिसन राधाकिसन मणियार, सुशिला राधाकिसन मणियार यांचे नावाची वर नमुद मिळकतीचे कब्जेदार सदरी असलेली नोंद कमी होण्यास लिहून देणार यांची काही एक हरकत वा तक्रार नाही त्या अनुषंगाने सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 6421/2025 दिनांक 18/08/2026 अन्वये कन्फर्मेशन डीड करून दिलेने लिहून देणार यांची नावे गाव नमुना नं.7/12 चे अधिकार अभिलेखातून कमी केली असे. सूची क्रमांक 2 (दस्त क्रमांक 6421/2025) वरून नोंद केली असे.