सातबारा Watch

← संगमनेर बुद्रुक

Ferfar #51609 · संगमनेर बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
133/184
Talathi
भुरे पांडूरंग अभंग
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/कुका/तु.जो.तु.बं./778/2025 संगमनेर दि.20/03/2025 अन्वये अर्जदार सुमन तुकाराम उगलमुगले, रा.संगमनेर बुद्रुक यांचे मौजे संगमनेर बुद्रुक ता.संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथील स.नं.133/184 क्षेत्र 50.00 चौमी असे क्षेत्र आहे. सदरचे क्षेत्राचे प्रमाणभुत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राचा तुकडा पाडून महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे एकत्रिकरण याबाबत अधिनियम 1947 मधील तरतुदींचा भंग झालेला आहे. सदर झालेला तुकडा नियमाधीन करणेकामी अर्जदार यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र दिनांक 7 सप्टेंबर 2017 व दि.3 जानेवारी 2018 तसेच महाराष्ट्र शासन अध्यादेश क्रमांक 14/2024 दि.15 ऑक्टोबर 2024 अन्वये उक्त जमिनीच्या चालु बाजार भावाचे मुल्यांकन रक्कम रु. 267000/- च्या 5% रक्कम रु.13350/- इतके नियमाधिकरण अधिमुल्य म्हणून चलनाने (चलन क्र. MH017385217202425M) दि. 07/03/2025 रोजी शासकीय खजिन्यात भरणा केलेला आहे.त्यान्वये मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांनी अर्जदार यांचा मौजे संगमनेर बुद्रुक येथील स.नं.133/184 क्षेत्र 50.00 चौमी. या क्षेत्राचा झालेला तुकडेबंदी कायद्याचा भंग आदेशातील शर्तीना अधिन राहून नियमाधिन केला त्यानुसार 7/12 चे इतर हक्कात तुकडा नियमीत असा शेरा घेणेत आला असे. मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्र.कावि/कुका/तु.जो.तु.बं./778/2025 संगमनेर दि.20/03/2025 वरोन नोद केली असे.