Ferfar #5884 · अंमळनेर
नेवासा, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
नेवासा येथील मे. दिवाणी न्यायाधीश साहेब(ज्यु.डी.) यांचे कडील रे.मु.नं. 1274/2021 सादर दिनांक: :-07/05/2026 अन्वये कोर्टहुकुमनामा
वादी सुभद्रा दादासाहेब जाधव , प्रतिवादी 1. केशव गोरक्षनाथ पवार 2. भिमाबाई गोरक्षनाथ पवार 3. जयश्री केशव पवार 4. अभिषेक केशव. यांच्यामध्ये कोर्ट सुलेनामा होऊन मौजे अंमळनेर ता. नेवासा येथील जमीन गट क्र :- 130/1 क्षेत्र 0 हे. 42 आर, गट क्र 130/2 क्षेत्र 0 हे. 41, गट क्र 131 क्षेत्र 0 हे. 83 आर, गट क्र 136/2 क्षेत्र 1 हे. 51 आर, गट क्र 69/1 क्षेत्र 0 हे. 49 आर पैकी क्षेत्राचे खालील प्रमाणे वाटप झाले आहे.
सदरचा दावा वादी हिने हिंदु वारसा कायदा कलम 6 प्रमाणे मयत गोरक्षनाथ विश्वनाथ पवार यांच्या मिळकतीमध्ये तिचा असलेला वारसा हक्क मिळणेसाठी दाखल केलेला आहे. सदर दाव्याचे पेन्डन्सीमध्ये वादी प्र.वादी यांचे नातेवाईकांनी मध्यस्थी करुन त्यांचे वाद मिटविलेला आहे व तडजोड घडवून आणलेली आहे.
वादी ही प्र.वादी नं.1 यांची सख्खी बहिण असून प्र.वादी नं.2 यांची मुलगी आहे. वादी व प्र.वादी नं.1, 2 यांचे पुर्वहक्कदार त्यांचे गोरक्षनाथ विश्वनाथ पवार हे होते. ते मयत असून त्यांना वादी व प्र.वादी नं.1, 2 यांचेशिवाय दुसरे कुणीही कायदेशीर वारस नव्हते व नाहीत. व दाव्यातील सर्व मिळकती मौजे अंमळनेर, ता. नेवासा येथील गट नं. 130/1 क्षेत्र0 हे 42 आर, गट नं. 130/2 क्षेत्र 0 हे 41 आर, गट नं. 131 क्षेत्र 0 हे 83 आर, गट नं. 136/2 पैकी क्षेत्र 1 हे 51 आर, गट नं.69/1 क्षेत्र 0 हे 49 आर या मिळकती मयत गोरक्षनाथ विश्वनाथ पवार यांच्या • स्वकष्टार्जीत उत्पन्नातून खरेदी केलेल्या मिळकती होत्या व आहेत. हे वादी व प्र.वादी यांना मान्य व कबूल आहे.
या तडजोडीप्रमाणे वादी हिला तिचे वारसा हक्काचे बदल्यात जमिनी ऐवजी रक्कमेच्या स्वरुपात मोबदला देण्याचे ठरलेले आहे. त्यानुसार वादी हिस तिचा वारसा हक्क व हिस्सा म्हणून रक्कम रुपये 6,00,000/- (सहा लाख रुपये) भारतीय स्टेट बँक, शाखा पानेगाव यांचेकडील डिमांड ड्राफ्टनं. 638425 दि. 12/03/2026 रोजीच्या डि.डि. अन्वये प्र.वादी यांनी दिलेली आहे. ती रक्कम वादीला मिळालेली असल्याने वादीला आता सदरचा दावा पुढे चालविणे नाही. वादीला तिचा हक्क व हिस्सा रकमेच्या स्वरुपात मिळालेला असल्याने वादी अगर तिचे वाली, वारस यापैकी कुणीही भविष्यात प्र. वादींविरुध्द दावा मिळकती संबंधी अगर वडिलोपार्जील मालमत्ते संबंधी कोणताही वाद कोणत्याही न्यायालयात उपस्थित करणार नाही. मोबदला मिळाल्याने आज रोजी वादीचा वारसा हक्क कायमस्वरुपी संपुष्टात आलेला आहे. हे वादी व प्र. वादी यांना मान्य व कबूल आहे.
आजरोजी वादी व प्र.वादी यांचे दरम्यान वरीलप्रमाणे तडजोड झालेली असल्याने व वादीला दावा पुढे चालविणे नसल्याने या तडजोडीचे आधारे दावा निकाली होण्यास वादी व प्र. वादी यांची हरकत नाही.
भारतीय नोंदणी कायदा कलम 89-अ अन्वये सदर तडजोडीच हुकुमनामा हा दुय्यम निबंधक यांचे कार्यालयात नोंदणीसाठी पाठविण्यात यावा. तसेच नोंदणीनंतर या तडजोडीची महसुली दप्तरी फेरफार अन्वये नोंद घेण्याचा संबंधित कामगार तलाठी यांना आदेश करण्यात यावा हि विनंती. दाव्याचा खर्च वादी व प्र.वादी यांनी आपआपला सोसावयाचा आहे.
वरीलप्रमाणे वादी व प्र. वादीमध्ये तडजोड झाली असून त्याप्रमाणे गावच्या दप्तरी रेकॉर्ड ऑफ राईटला नोंदी होण्यास वादी व प्र.वादी यांची संमती आहे. येणेप्रमाणे तडजोड झाली असून त्याप्रमाणे हुकुमनामा होण्यास विनंती आहे.
वरीलप्रमाणे मौजे अंमळनेर येथील शेतजमीनीचे वाटप झाले. मा. न्यायालयाकडील हुकूमनामा व सह दुय्यम निबंधक नेवासा यांचे कडील कलम 89 अ अन्वये फायलिंग दस्त 205 सादर दिनांक: :-07/05/2026 ,सुचि क्र.2 वरून नोंद घेतली असे.