सातबारा Watch

← कांगोणी

Ferfar #11416 · कांगोणी

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
329/1/ई
Talathi
संध्या सुधाकर गडकर
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 तहसिलदार साहेब नेवासा यांचे कडील लेखी पत्र जावक क्र. कावि/कुका/2880/2026 दिनांक : 29/10/26 अन्वये आणि अपर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे कडील लेखी आदेश जावक क्र. कुका/कक्ष 10क/ई- 3302606/एस.आर./03/2026 अहिल्यानगर दिनांक : 23/10/26 अन्वये अर्जदार श्री. आनंद गौतमचंद शिंगी,रा- नेवासा खुर्द ,ता-नेवासा,जिल्हा- अहिल्यानगर यांनी मौजे कांगोणी येथील गट क्र. 329/1/ई क्षेत्र 1.00 आर,आकार 2.90 रु या नविन शर्तीच्या सिलिंग वाटप जमिनीचे भोगवटा वर्ग 2 मधुन भोगवटा वर्ग 1 मध्ये रुपांतरण करणेकामी नजराणा रक्कम रु. 2,84,000/- (अक्षरी दोन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपये मात्र/-) दिनांक : 28/10/2026 रोजी भरलेने सदर गट क्र. 329/1/ई क्षेत्र 1.00 आर,आकार 2.90 रु या सिलिंग वाटप जमिनीचे खालील नमुद अटी व शर्तीच्या अधीन राहुन भोगवटा वर्ग 2 मधुन भोगवटा वर्ग 1 मध्ये रुपांतरण करणेत येत आहे. 1)सदर जमिनीचा वापर अकृषिक वापर करावयाचा असल्यास सक्षम प्राधिका-याची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील. 2)सदर जमिनीस महाराष्ट्र शेतजमिन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) अधिनियम 1961, महाराष्ट्र जमिन महसुल संहिता 1966,मुंबई जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्यांचे एकत्रिकरण अधिनियम 1947 तसेच इतर लागु कायद्यांतील तरतुदी लागु राहतील. 3)सदर जमिनी बाबत कोणताही न्यायप्रविष्ठ वाद,स्थगिती आदेश किंवा सक्षम न्यायालय अथवा प्राधिकरणाचा निर्णय असल्यास त्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून हा आदेश लागू राहील. 4)भविष्यात शासनाच्या निदर्शनास कोणतीही अनियमतता शर्तभंग व इतर अटींचा भंग अथवा फसवणुकीची बाब निदर्शनास आल्यास सक्षम प्राधिकार्‍यास हा आदेश रद्द करण्याचा व कायद्यानुसार पुढील कार्यवाही करण्याचा अधिकार राहील. 5)भविष्यात शर्तभंग आढळून आल्यास अर्जदारास मूल्यांकनाच्या 75 % रक्कम (25% रक्कम वगळून) शासन खाती चलनाद्वारे भरणे बंधनकारक राहील. 6)भविष्यात मुलांकनासंबंधी कोणत्याही बाबी उद्भवल्यास मूल्यांकनाची फरकाची जास्तीची रक्कम संबंधित अर्जदारास भरणे बंधनकारक राहील. 7)वरील कोणत्याही अटींचा भंग झाल्यास अगर सादर केलेली कागदपत्रे अथवा माहिती खोटी असल्याचे आढळून आल्यास दिलेली मान्यता रद्द करून नुकसान भरपाई न देता सदरील जमीन सरकार जमा करण्यात येईल. 8)सदर रूपांतरणामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही नागरी महसुली अथवा इतर वादासंबंधीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अर्जदाराची राहील. सदर नोंद तहसिलदार साहेब नेवासा यांचे कडील लेखी पत्र जावक क्र. कावि/कुका/2880/2026 दिनांक : 29/10/26 अन्वये आणि अपर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे कडील लेखी आदेश जावक क्र. कुका/कक्ष 10क/ई- 3302606/एस.आर./03/2026 अहिल्यानगर दिनांक : 23/10/26 अन्वये नोंद घेतली असे.