सातबारा Watch

← कुकाणा

Ferfar #6123 · कुकाणा

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
125/24, 125/28, 96/2/क/5
Talathi
क्षिरसागर अभिजीत विलास
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : रे.मु.नं. 48/2026 आदेश दिनांक : 01/10/2026 ज्ञा. मे. सिव्हिल जज साहेब ज्युनियर डिव्हिजन, नेवासा यांचेकडील रे.मु.नं. 48/2026 अन्वये वादी किरण अर्जुन शिंदे व प्रतिवादी नंबर 1) अर्जुन साहेबराव शिंदे 2) अरुणा अर्जुन शिंदे 3) रवि अर्जुन शिंदे यांच्यात खालील प्रमाणे सुलेनामा झाला असून तो पुढीलप्रमाणे. वादी किरण अर्जुन शिंदे यांच्या नावावर आलेले मौजे-कुकाणा येथील क्षेत्र खालीलप्रमाणे गट नं.125/24 पै. क्षेत्र 1.00.00 आर .चौ.मी. प्रतिवादी वादी नं.2 अरुणा अर्जुन शिंदे यांच्या नावावर आलेले मौजे-कुकाणा येथील क्षेत्र खालीलप्रमाणे गट नं.125/24 पै. क्षेत्र 0.50.00 आर .चौ.मी. प्रतिवादी वादी नं.3 रवि अर्जुन शिंदे यांच्या नावावर आलेले मौजे-कुकाणा येथील क्षेत्र खालीलप्रमाणे गट नं.125/28 क्षेत्र 1.09.00 आर .चौ.मी. गट नं.96/2/क/5 क्षेत्र 2.66.27 आर .चौ.मी. प्रतिवादी नं. 2 च्या नावावरील असणारे क्षेत्र हे प्रतिवादी नं. 2 हिचे हयाती पर्यत प्रतिवादी नं. 2 चे नावावर राहील व हयात असे पर्यत आज ज्या स्थितीत राहतात तसेच त्या सध्या राहत्तो तेथेच हयाती पर्यत प्रतिवादी नं. 1 व 2 आई वडील हे राहणार आहे. त्यांचेनंतर सदरचा अर्धा गुंठा क्षेत्र वादीस देणेचे ठरलेले आहे. हे वादी प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. प्रतिवादी नं. 2 चे वहीवाटीस वादीने हरकत करावयाची नाही. तसेच प्रतिवादी नं. 1 व 3 यांना सदर मिळकतीमध्ये हिस्सा घेणे नाही, त्यांची काहीएक तक्रार नाही. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. प्रतिवादी नं. 3 यांच्या वाटपास आलेल्या मिळकतीमध्ये वादी व प्रतिवादी नं. 1 व 2 यांना हिस्सा घेणे नाही. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. प्रतिवादी नं. 1 अर्जुन साहेबराव शिंदे यांनी त्यांचा दावा मिळकतीमध्ये असलेला हिस्सा वादी व प्रतिवादी यांचे लाभात सोडून दिलेला आहे. तसेच त्यांची देखभाल, सांभाळ, पालनपोषणाची जबाबदारी हि वादी व प्रतिवादी नं.3 यांनी घेतलेली आहे. हे वादी व प्रतिवादी यांना मान्य व कबूल आहे. तसेच वादी याने प्रतिवादी नं. 1 यांना त्रास द्यावयाचा नाही व त्यांची बदनामी होईल असे कुठलेही कृत्य करावयाचे नाही. येणेप्रमाणे वादी व प्रतिवादी यांच्यामध्ये सुलेनामा झालेला असून अर्ज व कलम 89 अ अन्वये फायलिंग सुची क्रं.2 दुय्यम निबंधक नेवासा यांचेकडील फायलिंग दस्त अनुक्रमांक 390/2026 दिनांक 29/ 10/ 2026 वरून नोंद केली असे.