सातबारा Watch

← भेंडे बुद्रूक

Ferfar #15834 · भेंडे बुद्रूक

नेवासा, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
209/1
Talathi
राहुल ग्यानु राऊत
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 नेवासा येथील मे.सिव्हील जज्ज साहेब (सि.डी )याचे कोर्ट हुकुमनामा रे.मु.नं.535/2026 कोर्टात वादी हनुमंत अशोक फुलारी वय 39 वर्ष धंदा शेती प्रतिवादी-1 )अशोक कडूभाऊ फुलारी वय 64 वर्ष 2 )लिलावती अशोक फुलारी वय 58 वर्ष 3 )जाबुवंत अशोक फुलारी वय 37 वर्ष सर्व राहणार भेंडा बुद्रुक 4 )सुनिता रावसाहेब जाधव वय 43 वर्ष राहणार चापडगाव यांचेत सरस निरागस मनाने वाटप झाले ते खालील प्रमाणे वादी हनुमंत अशोक फुलारी यांना या वाटपामध्ये दावा मिळकत मौजे भेंडा बुद्रुक ता नेवासा येथील गट नं 209/1 क्षेत्र 1 हे 91 आर खराबा 0.03 आर या मिळकतीमध्ये दक्षिण उत्तर बांध टाकून दोन समान हिस्से करून पूर्कवेकडील बाजूची वाटणी क्षेत्र 0हे 96 आर खराबा 0.01 आर हे क्षेत्र वादीस मालकी हक्क्चे प्रत्यक्षात कब्ज्यात देण्यात आले आहे.हे उभयतांना मान्य व कबूल आहे.प्रतिवादी नं 3 )जांबुवंत अशोक फुलारी यांना या वाटपाने मध्ये दावा मिळकत मौजे भेंडा बुद्रुक ता नेवासा येथील गट नं 209/1 क्षेत्र 1हे 91 आर खराबा 0 .03 आर या मिळकतीमध्ये दक्षिण उत्तर बांध टाकून दोन समान हिस्से करून पश्चिमेकडील बाजूचे वाटणी क्षेत्र 0 हे 95 आर खराबा 0 .02 आर हे क्षेत्र वादीस मालकी हक्काने प्रत्यक्षात कब्जात देण्यात आले आहे हे उभयतांना मान्य व कबूल आहे.गट नं 209/1 या मिळकतीचे उत्तर बाजूने पूर्व पश्चिम लांबीचा व उत्तर दक्षिण 12 फुट रुंदीचा रस्ता वादी व प्रतिवादी नं 3 यांनी ठेवलेला असून सदर रस्त्याने जाने येण्यास वादी व प्रतिवादी नं 3 यांनी एकमेकास हरकत अडथळे करावयाचे नाही हे उभयतांना मान्य व कबूल आहे .गट नं 209/1 मध्ये एक चालू पाण्याची विहीर व चालू पाण्याचा बोअरवेल असून त्याचे पाणी वादी व प्रतिवादी नं 3 यांनी 1/2 हिसाय्प्रमाणे घेण्याचे ठरले आहे त्याचे लाईट बिल हे देखील 1/2 हिस्याप्रमाणे भरावयाचे आहे तसेच इतर जो काही खर्च होईल तो देखील सम प्रमाणात करावयाचे आहे.हे उभयतांना मान्य व कबूल आहे.प्रतिवादी नं 1 अशोक कडूभाऊ फुलारी व प्रतिवादी नं 2 लिलावती अशोक फुलारी हे वादी व प्रतिवादी नं 3 यांचे वडील व आई असून प्रतिवादी नं 1 व 2 यांनी त्यांचा दावा मिळकतीमधील हिस्सा हा आपले मुले वादी व प्रतिवादी नं 3 यांचे हक्कात सोडून दिलेला आहे प्रतिवादी नं 1 व 2 यांची संपूर्ण जबाबदारी हि वादी व प्रतिवादी नं 3 यांनी घेतलेली आहे हे उभयतांना मान्य व कबूल आहे.प्रतिवादी नं 4 सुनिता रावसाहेब जाधव हि वादी व प्रतिवादी नं 3 यांची बहिण आहे प्रतिवादी नं 1 व 2 यांची मुलगी आहे.प्रतिवादी नं 4 हि तिच्या पतीकडे आनंदाने नांदत असून प्रतिवादी नं 4 हिने तिचा दावा मिळकती मधील हिस्सा व हक्क हा वादी व प्रतिवादी नं 3 यांचे हक्कात सोडून दिलेला आहे प्रतिवादी नं 4 ची चोळी बांगडी सणवारइत्यादी खर्च वादी व प्रतिवादी नं 3 हे करणार आहे .हे प्रतिवादी नं 4 ला मान्य व कबूल आहे.याप्रमाणे सुलेनामा झाला असून त्याप्रमाणे नोंदणी कायदा कलम 89-अ प्रमाणे सदर हुकुम नामा नोंदविण्याकामी दुय्यम निबंधक नेवासा यांना आदेश करण्यात आला.फायलिंग दस्त अनुक्रमांक व दिनांक 317/2026 दिनांक 08/09/2026 मुद्रांक शुल्क रुपये 300/-कोर्ट हुकूमनामा वरून नोंद केली असे.