Ferfar #5415 · पाचुंदे
नेवासा, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2/1
- Talathi
- देविदास राजेंद्र लोंढे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
मौजे पाचुंदे येथील फेरफार नंबर 520 पाहाता सर्व्हे नं. 24/1 चा कुळ गंगाधर बापुजी होंडे यांचा कु का क.32 एम प्रमाणे खरेदी किंमत बाबतचा असून कुळाचे नाव कब्जेदार सदरी दाखल करुन इतर हक्कात कु का क 43 प्रमाणे नवीन शर्त शेरा दाखल केलेला आहे. तसेच कुळ गंगाधर बापुजी होंडे यांनी फेर न.530 पाहता पोपट गंगाधर होंडे व इतर यांचे आपापसात वाटप केलेले आहे. तसेच फेर न.1949 ने पोपट गंगाधर होंडे यांनी साहेबराव अंबादास होंडे व इतर यांना वाटप करून दिलेचे दिसून येते.
शासन परिपत्रक क्र. टिएनसी 04/2013/प्र.क्र.196/ज1, दि. 16/07/2014 नुसार मौजे पाचुंदे येथील गट नंबर 24/1 क्षेत्र 0 हे 73 आर व पो.ख.0.05 हे आर आकार 1.80 रु पै. ही जमीन कुळास मिळून सक्षम अधिकार तहसिलदार तथा शेतजमीन न्यायधिकरण नेवासा यांचा निकाल होऊन खरेदीखते वैध ठरवून 10 वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला असल्याने व शासन परिपत्रक क्रं. जमिन -2025/प्र.क्र.336/जमिन-01 (ई-1379234) दिनांक 16 जुलै 2026 नुसार अर्जदार यांना जमिनीच्या आकाराच्या 40 पट नजराणा रक्कम भरण्याची अट रद्द करणेत आलेली आहे. त्यामुळे मौजे पाचुंदे येथील गट नं. 24/1 क्षेत्र 0 हे 73 आर व पो.ख.0.05 हे आर आकार 1.80 रु पै च्या इतर हक्कातील सक्षम प्राधिकरणाच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास बंदी - कुळ कायद्याने प्राप्त जमीन, नियंत्रित सत्ता प्रकार कु.का.क असा शेरा कमी करून सदर क्षेत्र भोगवटादार वर्ग 2 चे भोगवाटादार वर्ग 1 करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासन परिपत्रक क्रं. जमिन -2025/प्र.क्र.336/जमिन-01 (ई-1379234) दिनांक 16 जुलै 2026 व मा.तहसीलदार नेवासा यांचेकडील आदेश क्र.कावी/कुका/एसआर-46/2026 नेवासा 09/09/2026 वरून नोंद.