सातबारा Watch

← लोणी मावळा

Ferfar #4702 · लोणी मावळा

पारनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
37, 43, 45
Talathi
परवेझ इनायत पटेल
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 राजेंद्र वाघमोडे सहकार अधिकारी (श्रेणी-१) अधिन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पारनेर तथा विशेष वसूली व विक्री अधिकारी, शरदचंद्र ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. वडझिरे ता. पारनेर जि. अहिल्यानगर यांच्याकडील पत्र दिनांक १९/१०/२०२६ अन्वये मा. उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांनी अडचणीतील पतसंस्था मधील कर्जाची वसूली जलदगतीने करण्याचे याचिका क्र.१०७९१/२०१५ मधील मा.उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांचेकडील दिनांक २१/९/२०२६ रोजीचे आदेश आदेशात नमूद आहे. त्यानुसार शासन निर्णय क्र.सीसीआर११२६/प्र.क्र.१६२/७-स हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय मुंबई- ३२ दिनांक १८ सप्टेंबर २०२६ अन्वये शासनाने महाराष्ट्र राज्यातील अडचणीतील नागरी/ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थांचे संचालक थकबाकीदार यांच्या मालमत्ता विक्रीसाठी समिती गठीत करणेत आलेली आहे. तसेच शरदचंद्र ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. वडझिरे ता. पारनेर जि. अहिल्यानगर ही संस्था आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेली पतसंस्था आहे, त्यामुळे सदर पतसंस्थेचे कर्जदार/थकबाकीदार यांचेकडून कर्जाची वसूली होणेसाठी मौजे लोणी मावळा येथील खालील नमूद कर्जदार/थकबाकीदार यांच्या स्थावर मालमत्तांवर बोजा दाखल करण्यात येत आहे. कुंदन कोंडीबा खैरे - गट क्रमांक - ३७, ४३, ४५ राजेंद्र वाघमोडे सहकार अधिकारी (श्रेणी-१) अधिन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पारनेर तथा विशेष वसूली व विक्री अधिकारी, शरदचंद्र ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. वडझिरे ता. पारनेर जि. अहिल्यानगर यांच्याकडील पत्र दिनांक १९/१०/२०२६ अन्वये नोंद घेतली.