Ferfar #8890 · हंगा
पारनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026अधिकारी : मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अधिकारी, श्रीगोंदा-पारनेर उपविभाग अहिल्यानगर
आदेश क्रमांक : क्रमांक. कावि/फौज-२/४१९/२०२६,
आदेश दिनांक : 23/10/2026
बाजूस दाखल केलेल्या गट नंबर करिता मा. प्रधान सचिव ( विशेष) गृह विभाग मंत्रालय मुंबई यांचेकडील आदेश दिनांक ०७/१०/२०२६, मा. अवर सचिव गृह विभाग मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्रमांक एमपीआयडी-००६२३/प्र.क्र.१४४/पोल-१५, दिनांक १२/१०/२०२६ व मा. उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, श्रीगोंदा-पारनेर उपविभाग अहिल्यानगर यांचेकडील आदेश क्रमांक. कावि/फौज-२/४१९/२०२६, दिनांक २३/१०/२०२६ नुसार महाराष्ट्र ठेवीदारांच्या ( वित्तीय संस्थामधील ) हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम १९९९(२००० च्या महाराष्ट्र १६)च्या कलम ४ चे पोट कलम (१)अन्वये सदर आदेशातील अनुसूचित विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे राजे शिवाजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित आणि सदर वित्तीय संस्थेचे अध्यक्ष, संचालक, व्यवस्थापक, प्रवर्तक, भागीदार, कर्मचारी अथवा अन्य कोणतीही व्यक्ती यांचेपैकी पोपट बोल्हाजी ढवळे यांचे नावे/हिस्स्यावर असलेल्या मालमत्ता जप्त करुन मिळकतीचे सातबारा उताऱ्यावर कब्जेदार सदरी “ महाराष्ट्र शासन “ नाव दाखल केले असे.